रोजचं एक सफरचंद डॉक्टरपासून ठेवतं दूर, पण रोज एक केळं खाल्ल्याने काय होतं माहितीये?

असे म्हणतात की, दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आरोग्य इतके चांगले राहते की आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही. मात्र, तुम्हाला माहित आहे रोज एक केळं खाल्ल्याने काय होते? चला जाणून घेऊया दररोज एक केळं खाण्याचे आरोग्यासाठीचे आश्चर्यकारक फायदे.
रोजचं एक सफरचंद डॉक्टरपासून ठेवतं दूर, पण रोज एक केळं खाल्ल्याने काय होतं माहितीये?
Freepik
Published on

असे म्हणतात की, दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आरोग्य इतके चांगले राहते की आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही. मात्र, तुम्हाला माहित आहे रोज एक केळं खाल्ल्याने काय होते? चला जाणून घेऊया दररोज एक केळं खाण्याचे आरोग्यासाठीचे आश्चर्यकारक फायदे.

केळीचे गुणधर्म

केळी हे अतिषय पौष्टिक असे फळ आहे. तसेच ते वर्षाच्या बारा महिने उपलब्ध असते. याशिवाय ते स्वस्त असल्याने खिशाला परवडणारेही असते. केळी या फळाला सर्वप्रथम Superfood म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच ते एक Superfruit ही आहे. याचे कारण यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे एकच फळ अनेक आजारांपासून वाचवते. जाणून घेऊया दररोज एक केळं खाल्ल्यानं आरोग्यासाठी काय फायदे होतील?

रक्तदाब नियंत्रण

केळीमध्ये शरीराला आवश्यक पोटॅशियम योग्य प्रमाणात असते. त्यामुळे दररोज एक केळं खाल्ल्यानं आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो.

जीवनसत्त्व ब ६

केळीतून जीवनसत्त्व ब ६ मिळते. हे जीवनसत्त्व मेंदूच्या कार्यासाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळे रोज एक केळं खाल्ल्याने मेंदू आणि स्नायूचा विकास होतो.

पचनसंस्थेचे कार्य सुधारते

केळीत असलेल्या फायबरमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. बद्धकोष्ठतेसारखे त्रास दूर होतात.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

केळीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक रेणू नष्ट करतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

इन्स्टंट एनर्जी

केळं खाल्ल्यानं तुमच्या शरीराला तातडीने ऊर्जेचा पुरवठा होतो. तुमचा थकवा जातो.

अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव

केळीत असलेले अँटीमाइक्रोबियल आणि अँटि-व्हायरल गुणधर्म आपल्याला अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून दूर ठेवते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in