सर्दी, पडसं, खोकला म्हंटलं की घरातल्या गृहिणी लगेचचं किचनमधुन ओवा आणतात. ओव्याचे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. लहान बाळापासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळेजण अपचनाच्या किंवा पोटाच्या समस्या निर्माण झाल्या की ओवा खातात. छोट्यातल्या छोट्या आजारांवर ओवा हा नैसर्गिक रित्या लाभकारक ठरतो. ओव्याचे आयुर्वेदीक आणि औषधी फायदे जाणून घेऊया.
ओवा हा सुगंधित असून त्याचा वापर हा आपल्या आहारातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो . आहारात असलेले पदार्थ जे काही बनवले जातात ते पदार्थ पचले जाण्यासाठी त्या पदार्थांमध्ये ओवा यांचा वापर केला जातो.
ओव्यांमध्ये पचनक्षमता मजबूत करण्यासाठी खूप सहकार्य करते.
ओव्या मध्ये असलेले ‘थायमॉल’ हे रासायनिक घटक आहेत. हा रासायनिक घटक आपली पचनक्रिया चांगली करण्यास मदत करते.
चिमूटभर मीठ घालून तळहातावर थोडासा चोळलेला ओवा चघळणे आणि गिळून टाकणे पोटाच्या विकारांसाठी गुणकारी ठरते.
रात्री एका चमचा ओवा पाण्यात घालून पिल्याने पोटदुखीच्या समस्या दूर होतात.
वाताचा त्रास कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन करायला हवे, ओवा खाल्ल्याने वात येणे कमी होते.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.