'व्हिटॅमिन ई कॅप्सूल'चा अतिवापर केल्यास होतात वाईट परिणाम

जेल किंवा फेस क्रीमचा वापर करण्यापेक्षा व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावण्याचा सल्ला दिला जातो. पण जर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केला गेला तर मग कठीण आहे.
'व्हिटॅमिन ई कॅप्सूल'चा अतिवापर केल्यास होतात वाईट परिणाम
Published on

प्रदूषण, वेगवेगळे हानिकारक कॉस्मेटिक्स, जंकफुड यामुळे आरोग्याची आणि त्वचेची मोठ्या प्रमाणात हानी होतं असते. डॉक्टर आणि क्लिनिक या पर्यायांपेक्षा लोकांना घरच्या घरी उपाय करायला आवडतात. सध्या मुली केसांना, चेहऱ्यावर चमक मिळवण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करतात. पण या व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करणे योग्य आहे का? त्याचा वापर कसा करायचा..? हे जर का माहीतच नसेल तर..? दररोज रात्री चेहऱ्यावर कोणत्याही जेल किंवा फेस क्रीमचा वापर करण्यापेक्षा व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे सुरकुत्या लगेच निघून जातात. पण जर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केला गेला तर मग कठीण आहे.

कारण व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर त्वचेवर केल्यास यातील घटक आपल्या त्वचेतील रक्तप्रवाह सुरळीत करतात. यामुळे त्वचेच्या आतील खराब झालेले ऊतक बरे होतात आणि आपली त्वचा तेजस्वी दिसते. पण दीर्घकाळ याचा वापर केल्यास काही समस्या उद्भवतात. त्वचा निस्तेज होणे. आकसल्यासारखे दिसणे. म्हणूनच व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर योग्य प्रमाणात करणे बंधनकारक आहे. आता आपण व्हिटॅमिन ई कॅप्सुलच्या अतिवापराने होणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

‘व्हिटॅमिन ई कॅप्सूल’ नक्की का वापरतात..?

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अल्फा- टोकोफेरॉल नामक एक घटक समाविष्ट असतो. याच्या वापराने त्वचेला धूळ, घाण आणि प्रदूषणापासून संरक्षण मिळते. अँटी ऑक्सीडेंट असल्याने हे घटक सुरकुत्या कमी करतात आणि चेहऱ्यावर चमक आणतात. म्हणूनच बहुतेक सौंदर्य तज्ञ त्यांच्या सौंदर्य आहारामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. या व्हिटॅमिन ई’च्या कॅप्सूलमध्ये तेल स्वरूपात असणारा घटक हा त्वचा आणि केसांसाठी लाभदायी मानला जातो. यामुळे ही कॅप्सूल फोडल्यानंतर त्यातील द्रव काही फेस क्रीममध्ये मिसळून चेहऱ्यावर लावले जातात. पण त्याचा अतिवापर केल्यामुळे काही काही समस्या निर्माण होतात

ऍलर्जी होऊ शकते –

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अनेक असे तत्त्व समाविष्ट असतात जे चेहऱ्यावर काही प्रमाणात वापरल्यास फायदे होतात. पण अनेकदा याचा अतिवापर केल्यास त्वचेवर पुरळ येते, खाज सुटू लागते, चेहऱ्यावरील त्वचा सुटू लागते आणि केस खराब होऊ शकतात. ही सर्व एलर्जीची लक्षणे आहेत. अशा समस्या असल्यास, कॅप्सूलचा वापर ताबडतोब थांबवा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरायचीच असेल तर तुमच्या नेहमीच्या क्रीममध्ये १ कॅप्सूल मिसळा आणि सतत २ ते ३ दिवस लावा, तरच चांगले परिणाम मिळतात. ते लावल्यानंतर मसाज करायला विसरू नका.

पिंपल्स येण्याची समस्या वाढू शकते –

व्हिटॅमिन ई कॅप्सूल अति वापरलायस त्वचेवर उलट कार्य करू शकतात. यामुळे तेलकट त्वचा असलेल्या मुली किंवा महिलांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरणे टाळावे. याचे कारण म्हणजे तेलकट त्वचेच्या तेल ग्रंथी अतिशय सक्रिय असतात.यामुळे व्हिटॅमिन ई’च्या कॅप्सूलमध्ये असलेले तेल त्वचेमध्ये तेलाचे प्रमाण वाढवते. परिणामी त्वचेची छिद्रे बंद होतात आणि यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in