
लग्न समारंभ किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार होताना सर्वोत्तम मेकअप तंत्रज्ञान म्हणजे पॅनकेक मेकअप. पॅनकेक मेकअप विशेष करून मनोरंजन जगात कलाकारांच्या मेकअपसाठी मोठ्याप्रमाणात केला जातो. मात्र, आता तंत्रज्ञान जास्तीतजास्त वेगाने पसरत असल्याने सामान्यांकडूनही याचा उपयोग केला जात आहे. पॅनकेक मेकअप हा लाइट मेकअप असतो जो तुम्हाला एकाच वेळी ग्लॅमर आणि मॅट फिनिश दोन्ही लूक देतात. जाणून घेऊ मेकअपसाठी पॅनकेकचा उपयोग कसा करतात? काय आहे योग्य पद्धत...
पॅनकेक मेकअप नेमका कसा असतो?
पॅनकेक हा फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर मिक्स करून तयार केलेले असते. याच्या उपयोगामुळे तुम्हाला त्वचेला फाउंडेशन, फाऊंडेशन बेस लावायची गरज नसते. तसेच कन्सिलरचीही गरज उरत नाही. यामुळे पुढील मेकअपसाठी तुमची त्वचा एकदम समांतर करता येते. १९३० च्या दशकात प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मॅक्स फॅक्टर यांनी विकसित केलेले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांमध्ये कलाकारांच्या मेकअपसाठी ही पद्धत खूप वापरण्यात आली. कालांतराने पॅनकेक मेकअपचे तंत्रज्ञान विस्तारत गेले.
पॅनकेक मेकअप कसा करावा?
पॅनकेक मेकअप करण्याची एक खास पद्धत आहे. त्यासाठी चेहरा हायड्रेटेड आणि मॉइश्चराईज्ड असणे आवश्यक आहे. कारण हा मेकअप कोरडा असतो. तसेच याच्या खूप जास्त वापरामुळे त्वचा कोरडी किंवा रूक्ष होऊ शकते. त्यामुळे पॅनकेक मेकअप करताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
चेहऱ्यावर प्राइमर लावून घ्या
पॅनकेक मेकअप करण्यापूर्वी चेहरा नरम असणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहऱ्यावर सर्वप्रथम प्राइमर लावून घ्या. यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि बेस तयार होतो. तसेच मेकअप जास्त वेळ टिकतो.
ओला स्पंज किंवा ब्रश
पॅनकेक थोडा ओला करून लावायचा असतो. त्यासाठी पॅनकेक लावण्याचा स्पंज किंवा ब्रश थोडा ओला असावा. मात्र, त्यात खूप जास्त पाणी असताही कामा नये. अन्यथा मेकअप खराब होतो. अतिरिक्त पाणी झाल्यास स्पंज किंवा ब्रश पिळून पाणी कमी करून घ्यावे.
आता पॅनकेक सगळीकडे समांतर लावा
स्पंज किंवा ब्रशने पॅनकेक चेहऱ्याच्या मध्यभागापासून लावायला सुरुवात करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर समांतर लावा. यामुळे तुम्हाला फाऊंडेशन व कन्सीलर लावण्याची गरज पडणार नाही.
पॅनकेक योग्य प्रकारे सेट करून घ्या
पॅनकेक चेहऱ्यावर सगळीकडे एकसारखे लावा. संपूर्ण चेहऱ्यावर एकसारखे लावल्याने पुढील मेकअप करताना फायदा होतो.
फिनिशिंग टच
पॅनकेक लावल्यानंतर आयशॅडो, ब्लश, लिप्स्टिक, काजल, म्हस्कारा लावून मेकअपला फायनल टच द्या.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)