
आतड्याचे आरोग्य उत्तम राखणे गरजेचे आहे. आतडे निरोगी असेल तर पचनक्रियेसंबंधी आजार होत नाही. चयापचय क्रिया व्यवस्थित सुरू राहते. बद्धकोष्ठता, अपचन, आम्लता वाढणे असे आजार होत नाहीत. आतडे निरोगी ठेवण्यासाठी पपई हे फळ एक वरदान आहे. जाणून घ्या रिकाम्या पोटी पपई खाण्याचे फायदे.
पपई नैसर्गिक रेचक
पपई हे फळ नैसर्गिक रेचक आहे. आतड्याच्या हालचाली नैसर्गिकरित्या उत्तेजित करते. यामुळे मल आतड्यातून बाहेर ढकलण्यात मदत मिळते. तुम्हाला सातत्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर महागडी औषधे घेण्याऐवजी सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी पपई खाऊन घ्या. यामुळे शौच नियमित आणि व्यवस्थित होते. शौचाला फार वेळ लागणार नाही.
पपेन एंझाइम
पपईमध्ये पपेन हे एंझाइम असते. या एंझाइममुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर तर होतोच याशिवाय अपचन, छातीत जळजळ, आम्ल ओहोटी आणि पोटाच्या अल्सरवरही उपचार करण्यास मदत होते.
पपई एक सुपरफूड
केवळ पपेन हे एंझाइम पपईतून मिळते असे नाही. तर पपई ही व्हिटामिन ए, सी आणि ई यांचे समृद्ध भांडार आहे. याशिवाय यामध्ये फोलेट, मॅग्नेशियम आणि तांबे देखील असते. शरीरातील अनेक आजारांवर मात करण्यासाठी आवश्यक व्हिटामिन्स पपईत मोठ्या मात्रेत असल्याने आपण याला सुपरफूड किंवा सुपरफ्रुट म्हणू शकतो.
बॉडी डिटॉक्स
आपल्या अस्वास्थकर जीवनशैलीमुळे तसेच अपौष्टिक जेवणामुळे आपल्या आहारातून शरीरात अनेकदा विषद्रव्यांची निर्मिती होते. हे विषारी द्रव्य आपल्याला वेळोवेळी बाहेर फेकावे लागतात. याला बॉडी डिटॉक्स म्हणजे शरीर विषमुक्त करणे म्हणतात. पपई हे नैसर्गिकरित्या शरीर विषमुक्त करते. त्यामुळे आपला खर्चही वाचतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)