आजकाल, बहुतेक पालकांना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे त्यांची मुले ऐकत नाहीत. प्रत्येक गोष्टीवर रागावतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी हट्टीपणा करतात. पूर्वी मुलं भीतीने शिस्तीचे पालन करत असत. परंतु आजची मुलं त्यांचे मत व्यक्त करतात. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांना सांभाळणे पूर्वीपेक्षा खूप कठीण जात आहे. जेव्हा मुले हट्टी,चिडचिडी किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावतात तेव्हा पालकांना त्यांना कसे हाताळायचे हे कळत नाही. म्हणूनच, या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करुन तुम्ही मुलांचा राग शांत करु शकता.
मुलांमध्ये हट्टीपणा आणि राग का वाढत आहे?
जेव्हा मुलांना त्यांच्या भावना योग्यरित्या समजत नाहीत तेव्हा ते रागाच्या किंवा हट्टीपणाच्या स्वरूपात व्यक्त होतात. याशिवाय, जेव्हा पालक दैनंदिन कामात व्यस्त असतात आणि मुलांना वेळ देऊ शकत नाहीत तेव्हा मुलं लक्ष वेधण्यासाठी हट्टी किंवा चिडचिडे होतात. मोबाईल फोन आणि टेलिव्हिजनच्या जास्त वापरामुळे मुलांची समज कमी होते. यामुळे त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींवरही राग येतो. जर मुलांना वारंवार दुर्लक्षित गेले केले किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ओरडले गेले तर ते आणखी रागवतात.
राग शांत करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
आजच्या पिढीतील मुलं, म्हणजेच Gen Z आणि Gen Alpha, खूप हुशार आहेत. ही मुले कोणाचेही ऐकण्यापूर्वी त्यांचे कारण जाणून घेऊ इच्छितात. म्हणूनच, तुमच्या मुलांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा तेव्हा ते आपोआप तुमचे ऐकतील.
दररोज १५ मिनिटे मुलांशी कोणताही सल्ला न देता बोला. तज्ज्ञांच्या मते,जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवल्याशिवाय किंवा ओरडल्याशिवाय फक्त त्यांचे ऐकले तर मुलं हळूहळू शांत आणि समजूतदार होतात.
याशिवाय, मुलांच्या भावना समजून घ्या, त्यांच्याबद्दल मत बनवू नका. जेव्हा तुमची मुलं रागावतात किंवा रडतात तेव्हा त्यांना लगेच शांत करण्याचा प्रयत्न करू नका. आधी त्यांना विचारा आणि काय त्रास होत आहे हे समजून घ्या, नंतर बोला.
तुमच्या मुलांना त्यांच्या चुकांसाठी ओरडू नका, त्यांना शिकवा. जर तुमच्या मुलाने चूक केली तर त्याला ओरडण्याऐवजी त्यांच्या चुकांबद्दल आणि पुढच्या वेळी ते काय चांगले करू शकतात याबद्दल बोला. यामुळे तुमच्या मुलांना तुम्ही त्यांचे मार्गदर्शक आहात असे वाटेल.
तुमच्या मुलांसाठी एक रुटीन तयार करा. त्यांना समजावून सांगा की खाणे, खेळणे, अभ्यास करणे आणि मोबाईल फोन वापरण्याच्या वेळा निश्चित आहेत. एक निश्चित रुटीन ठेवल्याने मुलांना संतुलन आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
मुलांशी बोलताना भावनिक शब्दांचा वापर करा. "तु नेहमीच असा करतो" असे शब्द बोलणे टाळा. त्याऐवजी, त्यांच्यासोबत बसून त्यांची चूक समजावून सांगा.