मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी खावी 'बिंबी फळा'ची भाजी

या भाजीत आढळणारी पोषकतत्व व खनिज आपल्या तब्येतीसाठी खूप लाभदायक असतात. जाणून घेऊयात तोंडलीच्या सेवनाने होणारे आरोग्यवर्धक फायदे
मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी खावी 'बिंबी फळा'ची भाजी

तोंडलीची भाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. या भाजीला आयुर्वेदात बिंबी फळ म्हणून ओळखतात. ही भाजी स्वादाला खूप छान असते. मात्र लहान मुलांना ती बऱ्यापैकी आवडत नाही. परंतु या भाजीत आढळणारी पोषकतत्व व खनिज आपल्या तब्येतीसाठी खूप लाभदायक असतात. जाणून घेऊयात तोंडलीच्या सेवनाने होणारे आरोग्यवर्धक फायदे

  • किडनीस्टोन – किडनीस्टोनचा आजार असेल तोंडली खाणे फायदेशीर आहे. कारण तोंडलीच्या सेवनामुळे किडनीस्टोन वाढत नाही.

  • मधुमेह – मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी तोंडल्याची भाजी जरूर खावी. कारण तोंडली रक्तातील वाढलेली साखर कमी करण्यास मदत करते. पण जर तुमची साखर अगोदरच नियंत्रणात असेल, तर मात्र तोंडली वारंवार खाऊ नये. त्याने तुमची साखर कमी होऊ शकते.

  • चयापचय क्रिया – तोंडली चयापचयाची क्रियेसाठी गुणकारी ठरते. तोंडली शरीरात लाल रक्तपेशी तयार करतात. कारण थायमिन आणि विटामीन बी१ हे ऊर्जा वाढवतात आणि चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते.

  • पोटाची काळजी – पोटाशी संबंधित कोणत्याही आजारांसाठी तोंडली फायदेशीर आहे. कारण तोंडलीत आढळणारे फायबर हे पचनक्रिया सुधारतात. यामुळे गॅस होणे, पिट होणे, अपचन या समस्यांपासून पोटाचे संरक्षण होते. याशिवाय मुळव्याधीसारख्या समस्येपासूनही आराम मिळतो.

  • वजन कमी होते – वजन कमी करायचे असेल, तर तोंडली जरूर खा. कारण यातील फायबर पोट बराचवेळ भरलेले ठेवते. परिणामी अतिरिक्त खाण्याची सवय मोडते आई हळूहळू वजन कमी होऊ लागते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in