मधुमेह असलेल्या व्यक्तींनी 'हे' फळ नक्की खावे, अनेक रोगांपासून मिळेल मुक्ती

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी 'हे' फळ नक्की खावे, अनेक रोगांपासून मिळेल मुक्ती

किवी फळ खाण्याचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत. त्यानुसार यामध्ये नैसर्गिकरीत्या रक्त पातळ कमी करण्याचा गुणधर्म असल्याने कोलेस्ट्राॅलचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास मदत करते.

किवी हे फळ तुम्हाला आवडत असेल, हे फळ खाणे शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरते. किवी फळ खाण्याचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत. त्यानुसार यामध्ये नैसर्गिकरीत्या रक्त पातळ कमी करण्याचा गुणधर्म असल्याने कोलेस्ट्राॅलचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्याचसोबत हृदयविकाराचे आजार असलेल्या व्यक्तींनी किवी फळ खाल्ल्यास उत्तम ठरेल. किवी हे फळ दिसायला चिकूसारखे असून आतमधून हिरव्या रंगाचे असते. या फळाची चव थोडी तुरट आणि गोड असली तरीही ते आरोग्याच्या संबंधित चयापयाच्या क्रियेसाठी लाभदायक मानले जाते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किवी फळ खाणे फायद्याचे आहे. कारण या फळाच्या आतील आणि बाहेरील साल ही गुणकारी मानली जाते. तसेच पाणी आणि पोटॅशिअमचे प्रमाण सुद्धा किवी फळात अधिक असल्याने अंगाला खाज येणे किंवा जळजळ होणे कमी होते. व्हिटामिन सी सुद्धा या फळात असून ते अनेक रोगांपासून आपला बचाव करते. खासकरून मलेरिया आणि डेंग्यू झालेल्या रुग्णांनी आजारपणात किवी फळ खाल्ल्याने त्याचे उत्तम फायदे दिसून येतात.

दिवसभरातील थकवा दूर करायचा असल्यास किवी फळ खाणे योग्य बाब आहे. तसेच रक्तामधील साखरेचे प्रमाण ही किवी फळ संतुलित राखते. किवी फळ खाणे हे आरोग्य तंदुरुस्त राखण्यासोबत सौंदर्य खुलवण्यास सुद्धा मदत करते. त्यानुसार जर तुमच्या चेहऱ्यालगत काळे डाग असल्यास किवी खाल्ल्याने ते हळूहळू कमी होतात.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in