मानदुखीने त्रस्त आहात? झोपताना 'हा' छोटा बदल करा; आरोग्यासाठी इतरही फायदे

डिजिटल युगात वावरताना हल्ली तासनतास एका ठिकाणी बसून काम करणे, तसेच मोबाईलवर रील्स पाहणे या कारणांमुळे मानदुखी सारख्या समस्या निर्माण होण्याचे प्रमाण खूप वाढत आहे. मानदुखीने त्रस्त असलेल्यांना झोपण्याच्या पद्धतीत बदल केल्याने मोठा फरक पडू शकतो. जाणून घ्या नेमके काय करायला हवे.
मानदुखीने त्रस्त आहात? झोपताना 'हा' छोटा बदल करा; आरोग्यासाठी इतरही फायदे
Published on

डिजिटल युगात वावरताना हल्ली तासनतास एका ठिकाणी बसून काम करणे, तसेच मोबाईलवर रील्स पाहणे या कारणांमुळे मानदुखी सारख्या समस्या निर्माण होण्याचे प्रमाण खूप वाढत आहे. मानदुखीने त्रस्त असलेल्यांना झोपण्याच्या पद्धतीत बदल केल्याने मोठा फरक पडू शकतो. जाणून घ्या नेमके काय करायला हवे.

उशीशिवाय झोपण्याचा प्रयत्न करा

मानदुखीने त्रस्त असणाऱ्यांनी उशीशिवाय झोपण्याचा प्रयत्न करावा. उशी न घेता झोपल्याने तुमची पोझिशन बदलते. पाठीचा कणा ताठ होतो. त्याचा हळूहळू निश्चितच फायदा होतो. याशिवाय कंबरदुखी, पाठदुखीमध्येही याचा फायदा होतो.

उशी न घेऊन झोपण्याचे अन्य फायदे

डोके जड पडत नाही

तुम्हाला झोपेतून उठल्यावर डोकं जड पडल्यासारखे वाटते का? उशीशिवाय झोपल्याने तुमची ही समस्या दूर होईल. तसेच झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

झोप चांगली आणि गुणवत्तापूर्ण होते

झोप चांगली आणि गुणवत्तापूर्ण होणे हे फार महत्त्वाचे आहे. डोक्याखाली उशी न घेता झोपल्याने तुम्ही एका सरळ रेषेत झोपता. ज्यामुळे तुमचा पाठीचा कणा, मान समांतर पद्धतीने आराम करतात. त्यामुळे मानदुखी थांबते, डोके जड पडत नाही. आरामदायक स्थितीमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि चांगली झोप होते.

ताण कमी होतो

उशी न घेतल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. चांगली झोप झाल्याने शरीराचा थकवा जातो. मनावरील ताण हलका होतो. तसेच तुमचे मन फ्रेश फिल करते.

या लोकांनी उशीशिवाय झोपणे टाळावे

उशीशिवाय झोपणे हे चांगले असले आणि त्याचे फायदे असले तरी काही लोकांनी उशीशिवाय झोपणे टाळायला हवे. ज्यांना संधीवात आहे किंवा फार काळापासून वेदना होत आहेत. त्यांनी उशी शिवाय झोपण्याचा प्रयत्न करू नये.

श्वसनाचे आजार

तुम्हाला जर श्वसनाचे आजार असतील जसे की स्लीप एपनिया किंवा अन्य श्वसनाचे आजार असतील तर तुम्हाला डोक्याखाली उशी घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराचा वरचा भाग उंचावला जावून उशी घेण्याचे फायदे होतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in