जम्मू-काश्मीरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? 'IRCTC'ने लाँच केले नवीन पॅकेज; जाणून घ्या सविस्तर

जम्मू-काश्मीरला भारताचे 'नंदनवन' म्हणून ओळखले जाते. केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील अनेक लोकांचे आवडते पर्यटन स्थळ जम्मू-काश्मीर आहे.
जम्मू-काश्मीरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? 'IRCTC'ने लाँच केले नवीन पॅकेज; जाणून घ्या सविस्तर

जम्मू-काश्मीरला भारताचे 'नंदनवन' म्हणून ओळखले जाते. केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील अनेक लोकांचे आवडते पर्यटन स्थळ जम्मू-काश्मीर आहे. त्यामुळे, न प्रत्येक वर्षी या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. खास करून नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान पर्यटकांची या ठिकाणाला पसंती असते. खरे तर जम्मू-काश्मीर हे पूर्वीपासूनच पर्यटकांचे आवडते ठिकाण होते आणि आज ही आहे. कारण, या परिसरात होत असलेला विकास यामुळे, येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पृथ्वीवरील स्वर्ग अशी ख्याती असलेल्या या परिसरात आल्यावर सुंदर दऱ्या, बर्फाच्छादित पर्वत, वन्य जीवन, स्थानिक कलाकुसर, खाद्यसंस्कृती इत्यादी अनेक गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

नुकतेच 'IRCTC' ने जम्मू-काश्मीरसाठी मार्च महिन्यातील खास टूर पॅकेज लाँच केले आहे. जर तुम्हाला जम्मू-काश्मीरला फिरायला जायचे असले तर, तुम्ही या टूर पॅकेजचा नक्कीच विचार करू शकता. कसे आहे हे टूर पॅकेज? चला तर मग जाणून घेऊ सविस्तर.

पॅकजचे नाव – Kashmir Heaven on earth ex Mumbai

पॅकेजचा कालावधी – ५ रात्री आणि ६ दिवस

ट्रॅव्हल मोड – फ्लाईट

पॅकेजमध्ये असणारी ठिकाणे - गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर

पॅकेजचे बुकिंग कसे करायचे ?

या पॅकेजचे बुकिंग करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवरून तुम्ही टूरचे बुकिंग करू शकता. यासोबत, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल. या पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

या पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा मिळणार ?

-या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळेल.

-तसेच, जेवणाची आणि नाश्त्याची सुविधा देखील मिळेल.

-या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला प्रवासाचा विमा देखील मिळेल.

जम्मू-काश्मीर टूर पॅकेजसाठी लागणारा खर्च किती ?

-जर तुम्ही या ट्रिपसाठी एकटे जाणार असाल तर तुम्हाला ५८ हजार ५०० रूपये भरावे लागतील.

-जर तुम्ही कपल असाल तर या टूर पॅकेजसाठी प्रति व्यक्ती ४९ हजार ६०० रूपये खर्च येईल.

-तीन व्यक्तींसाठी या टूर पॅकेजचा खर्च हा प्रति व्यक्ती ४६ हजार ३०० रूपये येईल.

जर तुमच्या कुटुंबासोबत लहान मुले असतील तर, तर त्यासाठी वेगळी फी तुम्हाला भरावी लागेल. ५-११ वर्षांच्या मुलासाठी (बेडसाठी) तुम्हाला ४४ हजार रूपये भरावे लागतील आणि बेड शिवाय, तुम्हाला ३८ हजार ५०० रूपये भरावे लागतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in