घराजवळ लावा 'या' औषधी वनस्पती...होतील खूप फायदे
फोटो सो : FPJ

घराजवळ लावा 'या' औषधी वनस्पती...होतील खूप फायदे

भारतामध्ये पारंपारिक उपचार पद्धती जसे की आयुर्वेदाने संपूर्ण आरोग्यासाठी औषधी वनस्पतींचे महत्त्व नेहमीच सांगितले आहे.
Published on

भारतामध्ये पारंपारिक उपचार पद्धती जसे की आयुर्वेदाने संपूर्ण आरोग्यासाठी औषधी वनस्पतींचे महत्त्व नेहमीच सांगितले आहे. घरच्या अंगणात औषधी वनस्पतींची लागवड करणे हा चांगला पर्याय आहे. आपल्या अंगणात, छतावर किंवा फुलांच्या कुंड्यांमध्ये या वनस्पती आपण लावू शकतो. घरच्या घरी आवश्यक औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी पुढे दिलेली माहिती आपल्याला मदत करेन.

तुळस

तुळस ही एक अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे जिचा उपयोग आयुर्वेदात प्राचीन काळापासून केला जात आहे. तुळस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवते आणि विविध आजारांपासून संरक्षण करते व श्वसनाच्या विकारांमध्ये मदत करते. तसेच, ताण आणि चिंता कमी करण्यात, शरीराच्या सुदृढतेसाठीही तुळस उपयुक्त आहे.

तुळस
तुळसफोटो सो : FPJ

अश्वगंधा

अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे, जी ताण कमी करते, शरीरातील उर्जा वाढवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. यामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषणतत्त्वांचा समावेश आहे.

अश्वगंधा
अश्वगंधाफोटो सो : FPJ

पुदिना

पुदिना पचन प्रणालीला मदत करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पुदिनामुळे पोटाच्या समस्या कमी करण्यासही मदत होते.

पुदिना
पुदिनाफोटो सो : FPJ

कडुनिंब

कडुनिंब ही एक अत्यंत उपयोगी औषधी वनस्पती आहे. कडुनिंबाच्या पानांमध्ये कडू आणि तुरट रस आढळतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स देखील या पानांमध्ये असतात. त्याचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयोग होतो. शिवाय, सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठीही ही पानं उपयोगी ठरतात.

कडुनिंब
कडुनिंबफोटो सो : FPJ

एलोवेरा (कोरफड)

एलोवेरा ही एक अत्यंत फायदेशीर औषधी वनस्पती आहे जिचा उपयोग त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी प्राचीन काळापासून केला जात आहे. अनेक प्रकारच्या त्वचा विकारांसाठी याचा वापर केला जातो, जसे की त्वचेची जळजळ, सनबर्न, इन्फेक्शन आणि पिंपल्स. एलोवेरामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीरातील विविध समस्यांवर प्रभावीपणे काम करतात.

एलोवेरा (कोरफड)
एलोवेरा (कोरफड) फोटो सो : FPJ

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

logo
marathi.freepressjournal.in