सकाळच्या नाश्त्यात बनवा रवा आणि पोह्याच्या पीठाचा डोसा; पाहा रेसिपी

गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो. दररोज सकाळी नाश्त्यात काय वेगळं बनवायचे? रवा आणि पोह्यापासून बनवलेला डोसा किंवा उत्तपा हा एक वेगळा स्वादिष्ट आणि झटपट होणारा नाश्ता ठरू शकतो. चला जाणून घेऊया रेसिपी...
सकाळच्या नाश्त्यात बनवा रवा आणि पोह्याच्या पीठाचा डोसा; पाहा रेसिपी
You Tube - Rashmi's Kitchen Marathi
Published on

गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो. दररोज सकाळी नाश्त्यात काय वेगळं बनवायचे? रवा आणि पोह्यापासून बनवलेला डोसा किंवा उत्तपा हा एक वेगळा स्वादिष्ट आणि झटपट होणारा नाश्ता ठरू शकतो. चला जाणून घेऊया रेसिपी...

साहित्य

१ वाटी रवा

१ वाटी पोहे

आवश्यकतेनुसार तेल

बारीक चिरलेली कोथिंबीर

बारीक चिरलेला कांदा

मसाला चटणी

मीठ

ENO (ऑप्शनल)

कृती

सर्वप्रथम रवा आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर पाण्यात हे पीठ १० मिनिटांसाठी भिजवून घ्या. पीठ थोडेसे घट्ट झाले असेल. आता या पीठाला पुन्हा मिक्सरमध्ये पाणी अॅड करून एकजीव आणि पातळ करून घ्या. डोशाचे पीठ जितके पातळ असते तितके पातळ करून घ्या. यात तुम्हाला हवे असल्यास ENO घाला नाही घातले तरी चालते. या तयार पीठात आता चवीनुसार मीठ घाला. हे पीठ थोडा वेळ भिजू द्या. तोपर्यंत कांदा बारीक चिरून तयार करून ठेवा. त्याचप्रमाणे कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्या.

आता गॅसवर पॅन ठेवून प्रथम त्याला आवश्यकतेनुसार तेल लावून घ्या. यावर डोशाचे तयार केलेले पीठ खोलगट चमचाने गोल आकारात टाका. त्यावर झाकण ठेवूण डोसा तयार होऊ द्या. डोसा तयार होत आला की त्यावर तुमची आवडती मसाला चटणी, कांदा, कोथिंबीर घाला. आता पुन्हा थोडावेळ डोसा छान भाजू द्या. नंतर तो उलटवा. डोसा उलटल्यानंतर दुसरी बाजू देखील छान भाजून घ्या. गरम गरम डोसा तयार आहे.

हा डोसा देखील तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबर सोबत खाऊ शकता. तसेच रोजच्या नाश्त्यापेक्षा हा डोसा अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात होणारा आहे. त्यामुळे तो झटपट तयार होतो. तुम्ही पोहे आणि रवा एकदाच मिक्सरमध्ये बारीक करून स्टोअर करू शकता. म्हणजे पुढील वेळी तुम्हाला फक्त पाणी घालून मिश्रण तयार करावे लागेल आणि वेळेची बचत होईल.

logo
marathi.freepressjournal.in