Ramzan 2025 : मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांमध्ये १८-१९ मार्चला सेहरी आणि इफ्तारची वेळ काय असणार? जाणून घ्या वेळापत्रक

रोजा हा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ठेवण्यात येतो. देशाच्या विविध भागांमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, त्यांना सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळेचा मागोवा ठेवावा लागतो ज्याला रमजान वेळापत्रक म्हणतात.
Ramzan 2025 : मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांमध्ये १८-१९ मार्चला सेहरी आणि इफ्तारची वेळ काय असणार? जाणून घ्या वेळापत्रक
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

इस्लाममध्ये पवित्र मानला गेलेल्या रमजान महिन्यातील १५ रोजे आता पूर्ण झाले आहे आणि हा महिना आता दुसऱ्या भागात पोहोचला आहे. जगभरातील मुस्लिम या महिन्यात रोजा अर्थात उपवास ठेवतात. चांगली कामे करतात. रोजा हा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ठेवण्यात येतो. देशाच्या विविध भागांमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, त्यांना सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळेचा मागोवा ठेवावा लागतो ज्याला रमजान वेळापत्रक म्हणतात.

इस्लाममध्ये रोजा सुरु करण्यापूर्वी सेहरी आणि रोजा सोडल्यानंतर इफ्तार करण्याची पद्धत आहे. अर्थात सेहरी सूर्योदयापूर्वी केली जाते. तर इफ्तार सूर्यास्तानंतर करायचा असतो. त्यामुळे रोजा ठेवण्यासाठी आणि रोजा सोडण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळा पाळणे महत्त्वाचे मानले गेले आहे.

रमजान २०२५ च्या महिन्यात भारतातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी (१८ मार्च) सेहरी आणि इफ्तारच्या वेळा येथे आहेत:

दिल्ली:

१ सेहरी: ०५:०८ सकाळी

२ इफ्तार: ०६:३४ संध्याकाळी

मुंबई:

१ सेहरी: ०५:३२ सकाळी

२ इफ्तार: ०६:४९ संध्याकाळी

हैदराबाद:

१ सेहरी: ०५:१६ सकाळी

२ इफ्तार: ०६:३८ संध्याकाळी

कोलकाता:

१ सेहरी: ०४:२७ सकाळी

२ इफ्तार: ०५:४८ संध्याकाळी

बेंगळुरू:

१ सेहरी: ०५:१५ सकाळी

२ इफ्तार: ०६:३५ संध्याकाळी

चेन्नई:

१ सेहरी: ०५:०४ सकाळी

२ इफ्तार: ०६:२० संध्याकाळी

रमजान २०२५: बुधवार, १९ मार्च रोजी सेहरी आणि इफ्तारची वेळ

सेहरी: सकाळी ५:१७

इफ्तार: संध्याकाळी ६:३४

सेहरी आणि इफ्तार म्हणजे काय?

मुस्लिम बांधव पहाटे उपवास सुरू करण्यापूर्वी आहार घेतात. ही वेळ सूर्योदयापूर्वी असते. त्याला सेहरी असे म्हणतात. तर संध्याकाळी सुर्यास्तानंतर उपवास सोडतात आणि जेवण करतात. त्याला इफ्तार असे म्हणतात. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सेहरी आणि इफ्तारची अचूक वेळ वेगवेगळी असते.

कृपया लक्षात घ्या इथे दिलेल्या वेळा अंदाजे आहेत आणि स्थानिक निरीक्षणे आणि गणना पद्धतींनुसार थोड्याशा बदलू शकतात. तुमच्या क्षेत्रातील अचूक वेळेसाठी स्थानिक धर्मगुरुंकडून किंवा संस्थांकडून याविषयी माहिती घ्या.

logo
marathi.freepressjournal.in