चेहऱ्यावरील डागांपासून सुटका मिळवण्याचा जादूई उपाय

चेहऱ्यावर पडलेले डाग तुम्हांला कळत-नकळत मानसिकदृष्ट्या कमजोर करते. या समस्येमागील कारण काहीही असेल परंटू त्यापासून सुटका मिळवण्याचा नैसर्गिक आणि घरगुती मार्ग म्हणजे...
चेहऱ्यावरील डागांपासून सुटका मिळवण्याचा जादूई उपाय

चेहऱ्यावर पडलेले डाग तुम्हांला कळत-नकळत मानसिकदृष्ट्या कमजोर करते. या समस्येमागील कारण काहीही असेल परंटू त्यापासून सुटका मिळवण्याचा नैसर्गिक आणि घरगुती मार्ग म्हणजे पपई. कच्चा पपई तुमच्या आत्मविश्वासाला आणि त्वचेलाही उजाळा देण्यास मदत करेल.

फायदेशीर पपई

पपईमध्ये आढळणारे पॅपिन नामक घटक त्वचेवरील डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरतात. त्यातील दाहशामक घटक व्रणांचे डाग कमी करण्यास मदत करतात. तसेच मेलॅनीनमधील असमतोल कमी करण्यास मदत करतात. (मेलॅनीनचे प्रमाण वाढल्यास त्वचेचा रंग गडद होतो)

कसा वापराल पपई ?

कच्चा पपई सोलून त्याचे लहान लहान तुकडे करावेत.

या तुकड्यांचा रस काढून गाळावा.

तयार रस चेहर्‍‍यावर लावून २० मिनिटे शांत पडून रहा.

त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

किती वेळा हा प्रयोग कराल?

दिवसातून एकदा हा रस चेहर्‍यावर लावणे पुरेसे आहे. यामुळे तुमचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

logo
marathi.freepressjournal.in