
नवरा-बायकोच्या नात्यात नेहमीच काही ना काही कारणावरून वाद किंवा भांडणं होत राहतात. हा वाद लवकरात लवकर मिटणे आवश्यक आहे. अन्यथा जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे नात्यात दुरावाही वाढतो. अशा वेळी काही छोट्या छोट्या गोष्टीतून हा तणाव कमी करता येऊ शकतो.
जोडीदारासोबत संवाद साधा
संवाद साधल्याने मन मोकळे होते. त्यामुळे जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद किंवा भांडणं झाल्यास काही वेळाने त्याच्याशी संवाद साधा. संवादामुळे एकमेकांच्या भावना समजतात. तसेच दुरावा कमी होतो.
योग्य वेळी सपोर्ट करा
जोडीदाराला योग्य वेळी त्याच्या कामात त्याला सपोर्ट करा. त्याला जाणीव करून द्या की तुम्ही त्यांच्या सोबत आहात. यामुळे जोडीदारासोबतचा विश्वास अधिक घट्ट होतो.
काही गोष्टी एकत्रितच करा
काही गोष्टी एकत्रित केल्याने संवाद साधायला मोकळीक मिळते. उदाहरणार्थ रात्रीचे जेवण. रात्रीचे जेवण एकत्रितच करायला हवे. यामुळे एकमेकांसोबत बोलता येते. आपला ताण हलका करता येतो. याशिवाय मेडिटेशन, योगा, मॉर्निंग वॉक अशा गोष्टी एकत्रित केल्याने एकमेकांना जास्त वेळ देता येतो.
एकमेकांसाठी काही गोष्टी करणे
जोडीदारासोबतचा तणाव दूर करण्यासाठी एकमेकांसाठी काही गोष्टी करायला हव्या. एकमेकांची छोटी-छोटी कामे करण्यात मदत करणे. उदाहरणार्थ एकमेकांचे कपडे घडी करून ठेवणे, एकमेकांसाठी चहा-कॉफी बनवणे इत्यादी यातून तुम्ही त्यांची काळजी घेत आहात, अशी भावना निर्माण होते.
छोटे छोटे सरप्राईज देत राहणे
तुमच्या जोडीदाराला वेळोवेळी खास वाटू द्या. यासाठी, कधीकधी त्यांचे आवडते अन्न शिजवणे, एक छोटीशी चिठ्ठी लिहिणे किंवा त्यांना मिठी मारणे यासारख्या छोट्या गोष्टी करा. यामुळे आनंदाचे हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्यांचा ताण कमी होऊ शकतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)