बदाम, अक्रोड,अंजीर,मनुका यांसारखा सुकामेवा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच. पण जर तुम्ही भिजवलेला सुका मेवा खात असाल तर हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ड्रायफ्रूट भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. यामुळे हे सहज पचण्यास मदत होते. यासोबतच ते भिजत ठेवल्याने त्यांच्यामध्ये असलेले हानिकारक प्रिझर्वेटिव्ह सुद्धा नष्ट होतात.
आपण बदाम,अक्रोड ,अंजीर आणि मनुका यांसारखी सुकी फळे भिजवून खाऊ शकतो. मात्र दुसरीकडे, काजू , पिस्ता आणि खजूर यांसारखी सुकी फळे भिजवून खाऊ नयेत.
ड्रायफ्रूट्सना भिजवून ठेवल्याने ते अंकुरित होतात. त्यामुळे त्यांची न्यूट्रीशनल वैल्यू वाढते. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
तुम्ही ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले तर तुमची पचनक्रिया निरोगी राहते. याशिवाय ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन्स
आणि मिनरल्स तुमच्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
सुक्या मेव्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात.हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात