'कुछ नहीं सिखाया मां-बाप ने', पोळ्या मऊ होत नाही म्हणून सासू ताणे मारते? पीठ मळण्याची 'ही' सोपी ट्रिक वापरा; स्तुतीसुमने उधळतील

दररोजच्या जेवणातील पोळ्या करतानाही त्या मऊ होत नाहीत. मात्र, सासरच्या लोकांची मानसिकता या गोष्टी समजून घेण्याची नसते. स्वयंपाक चविष्ट होत नाही म्हणून ताणे ऐकावे लागतात. काळजी करू नका. पीठ मळण्याचे तंत्र जाणून घ्या. पोळ्या एकदम मऊ होतील. ताण्यांऐवजी सासरची मंडळी तुमच्यावर स्तुतीसुमने उधळतील चला जाणून घेऊया...
'कुछ नहीं सिखाया मां-बाप ने', पोळ्या मऊ होत नाही म्हणून सासू ताणे मारते? पीठ मळण्याची 'ही' सोपी ट्रिक वापरा; स्तुतीसुमने उधळतील
FPJ (Canva)
Published on

पूर्वी मुलींना शिक्षण नसल्याने केवळ घरकाम असायचे. त्यामुळे त्यांना चविष्ट आणि उत्कृष्ट स्वयंपाक करणे काही फारसे अवघड वाटत नव्हते. मात्र, आता मुली उच्च शिक्षण घेतात. परिणामी मोठा वेळ हा अभ्यासात जातो. नंतर करिअरसाठी अर्थात जॉबची धावपळ असते. या धावपळीत अनेक मुली स्वयंपाकाच्या कला शिकण्यात थोड्या मागे राहतात किंवा लग्न ठरल्यानंतर त्या स्वयंपाक शिकतात. परिणामी दररोजच्या जेवणातील पोळ्या करतानाही त्या मऊ होत नाहीत. मात्र, सासरच्या लोकांची मानसिकता या गोष्टी समजून घेण्याची नसते. स्वयंपाक चविष्ट होत नाही म्हणून ताणे ऐकावे लागतात. काळजी करू नका. पीठ मळण्याचे तंत्र जाणून घ्या. पोळ्या एकदम मऊ होतील. ताण्यांऐवजी सासरची मंडळी तुमच्यावर स्तुतीसुमने उधळतील चला जाणून घेऊया...

FPJ (Canva)

पीठ योग्य प्रकारे मळणे महत्त्वाचे

मऊ पोळ्या होण्यासाठी पीठ योग्य प्रकारे मळणे महत्त्वाचे असते. मात्र, हे खूप कष्टाचे असते. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. इतके की अनेकांना पीठ मळणे म्हणजे खूप आव्हान वाटते. तसेच यासाठी खूप वेळ देखील जातो. तुमचीही अशीच परिस्थिती आहे का? मग ही अगदी छोटी ट्रिक वापरा. पीठ मिनिटांत मळून होईल. पोळ्याही होतील मऊ मऊ...

पीठ मळण्यासाठी कडक पाणी वापरा

तुम्हाला पटापट पीठ मळायचे असेल पीठात गरम पाणी अगदी उकळून घेतलेले कडक पाणी वापरा. यामुळे ग्लूटेन जलद तुटण्यास मदत होते, पीठ मऊ, गुळगुळीत होते आणि काम करणे खूप सोपे होते. शिवाय, मळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि जवळजवळ शून्य प्रयत्न करावे लागतात.

प्रत्यक्ष कृती

सर्व प्रथम पीठ घ्या. पीठात तुमच्या चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घ्या. आता पिठात उकळलेले पाणी हळूहळू घाला. सुरुवातीला चमच्याने हे पाणी मिक्स करा. दोन-तीन मिनिटांनी पाणी जेव्हा कोमट होईल. तेव्हा हाताने पीठ मळणे सुरू करा.

तेल किंवा तूप घाला

पीठ निम्म्यापेक्षा जास्त मळून झाले की शेवटच्या टप्प्यात तेल किंवा तूप घाला. यामुळे मऊपणा वाढतो आणि पीठ अधिक लवचिक होते. तुम्ही एक चमचा तेल किंवा तूप घालून मळू शकता.

त्यानंतर पीठ ओलसर कापडाने झाकून ठेवा आणि पीठ १५-२० मिनिटे राहू द्या. यामुळे पीठ पूर्णपणे ओले होण्यास मदत होते आणि पोळ्या लाटणे सोपे होते. पीठ चांगले मळल्याने पोळ्या एकदम मऊ होतील.

logo
marathi.freepressjournal.in