हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना सुखकर प्रवासासाठी खास टिप्स; फॉलो करा आणि सहलीचा घ्या मनमुराद आनंद

उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आहेत. सहलीला जाण्याचा आनंद प्रत्येकालाच घ्यायचा असतो. मात्र, हृदयरोगाच्या रुग्णांसाठी हे अत्यंत कठीण असते. किंबहुना यामुळे हृदयरोगाचे रुग्ण अनेक वेळा सहलीला जाण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांना सहलीचा मनमुराद आनंद घेता येत नाही. हृदयरुग्णांना आपल्या जीवलगांसोबत सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या प्रवासात काळजी घेण्याच्या या काही खास टिप्स.
हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना सुखकर प्रवासासाठी खास टिप्स; फॉलो करा आणि सहलीचा घ्या मनमुराद आनंद
Freepik
Published on

उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आहेत. सहलीला जाण्याचा आनंद प्रत्येकालाच घ्यायचा असतो. मात्र, हृदयरोगाच्या रुग्णांसाठी हे अत्यंत कठीण असते. हृदयरोगाच्या रुग्णांना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. किंबहुना यामुळे हृदयरोगाचे रुग्ण अनेक वेळा सहलीला जाण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांना सहलीचा मनमुराद आनंद घेता येत नाही. हृदयरुग्णांना आपल्या जीवलगांसोबत सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या प्रवासात काळजी घेण्याच्या या काही खास टिप्स.

सहलीसाठी योग्य ठिकाण निवडा

हृदयरोग असलेल्यांनी सहलीला जाण्यासाठी योग्य ठिकाण निवडायला हवे. त्यांनी शक्यतो अति उंचावरील किंवा थंड ठिकाणांवरील सहली वर जाणे टाळावे. याऊलट सखल मैदानी प्रदेश, बीच अशी ठिकाणे निवडावीत.

उंच ठिकाण निवडल्यास

उंच ठिकाणी सहलीला जाणार असाल तर शरीराला त्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्या. उंचावरील ठिकाणी हळूहळू चढा. थोडा थोडा ब्रेक घेत उंचीच्या ठिकाणी जावे. जेणेकरून हृदयावर एकदम ताण पडणार नाही.

श्रम टाळा

प्रवासादरम्यान अतिश्रम करू नका. उदाहरणार्थ जड वस्तू उचलणे टाळा. शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका.

जेवणाची विशेष काळजी घ्या

हृदयरोगाच्या रुग्णांनी सहलीला जात असताना तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळायला हवे. आवश्यक प्रमाणात पाणी प्यावे. मद्यपान आणि धूम्रपान हे हृदयासाठी धोकादायक आहेत ते टाळायलाच हवे.

निघण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

हृदयरोग रुग्णांनी सहलीला किंवा प्रवासाला जाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर तुमच्या सध्याच्या आरोग्य स्थितीचे मूल्यांकन करतील आणि योग्य प्रवास सल्ला देतील आणि प्रवासादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे देखील विचारतील.

औषधे सोबत ठेवा

प्रवासात तुमची सर्व आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणात सोबत ठेवा. तसेच, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची एक प्रत आणि तुमच्या वैद्यकीय नोंदींची एक प्रत सोबत ठेवा. सहज ओळखता येईल यासाठी औषधे नेहमी त्यांच्या मूळ पॅकेजिंगमध्ये ठेवा.

logo
marathi.freepressjournal.in