दूध नासलंय? चिडचिड करू नका; झटपट बनवा कलाकंद; आरोग्यालाही फायदेशीर; जाणून घ्या रेसिपी

दूध नासले तर चिडचिड करू नका. झटपट कलाकंद बनवता येते. कॅल्शियमचा मोठा स्रोत असलेले हे कलाकंद आरोग्यालाही फायदेशीर असते. जाणून घ्या रेसिपी आणि आरोग्यासाठीचे फायदे.
दूध नासलंय? चिडचिड करू नका; झटपट बनवा कलाकंद; आरोग्यालाही फायदेशीर; जाणून घ्या रेसिपी
Youtube - Preeti kitchen
Published on

उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात उच्च तापमान आणि खूप जास्त गरम होत असल्याने दूध नासण्याचे प्रमाण मोठे असते. अनेक वेळा तर फ्रीजमध्ये ठेवलेले दूध ही नासते. दूध नासू नये यासाठी तुम्ही थोडीफार काळजी घेऊ शकता. मात्र, तरीही दूध नासले तर चिडचिड करू नका. झटपट कलाकंद बनवता येते. कॅल्शियमचा मोठा स्रोत असलेले हे कलाकंद आरोग्यालाही फायदेशीर असते. जाणून घ्या रेसिपी आणि आरोग्यासाठीचे फायदे.

कलाकंद रेसिपी

दूध नासल्यानंतर सर्वप्रथम दुधातील सर्व पणी गाळणीने गाळून घ्या. पाणी गाळून घेतल्यानंतरही दुधात पाणी शिल्लक आहे, असे वाटत असेल तर गाळणीच्या बारीक कापडात फाटलेले दूध घाला आणि या कापडाची मोट बनवून चांगले पिळून काढा. आता फाटलेले दूध गोळे-गोळे स्वरुपात दिसेल. हे पातेल्यात टाकून त्यामध्ये साखर घाला. साखरेला पाणी सुटल्याने हे छान ओलसर होईल. जोपर्यंत संपूर्ण पाणी जळत नाही. तोपर्यंत मंद आचेवर तापवत राहा. संपूर्ण पाणी जळत येईल तेव्हा यामध्ये छान विलायची पूड घाला. नंतर गॅस बंद करून एका वाटीत किंवा ताटात काढून घेऊन हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. कलाकंद तयार होईल.

कलाकंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे

दूध हे कॅल्शियम आणि अनेक प्रथिने तसेच खनिजांचा मोठा स्रोत असते. त्यामुळे कलाकंदमध्येही हे गुणधर्म येतात. कलाकंद खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते.

प्रथिने मिळतात

कलाकंदमध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक प्रथिने असतात. जी शरीरांमधील उती निर्माण आणि उतींना कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक असते.

ऊर्जा प्रदान करतात

कलाकंदमध्ये कार्बोहायड्रेट असतात. जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात.

कलाकंद खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. )

logo
marathi.freepressjournal.in