Double Chin मुळे त्रस्त आहात; सेल्फीसुद्धा घ्यावासा वाटत नाही? हे सोपे पण प्रभावी व्यायाम करा आणि पाहा फरक

Double Chin म्हणजे साधारण हनुवटी खालची जबड्याची रेषा असते त्या भागात फॅट वाढल्यामुळे फुगवटा येतो. त्यामुळे सौंदर्य बिघडते. अनेकांना तर या Double Chin मुळे तर सेल्फी घ्यायचीही इच्छा होत नाही. तुम्ही सुद्धा या Double Chin मुळे त्रस्त आहात का? तर बसल्या जागी करू शकता असे सोपे व्यायामप्रकार इथे दिले आहेत. ते ट्राय करून पाहा
Double Chin मुळे त्रस्त आहात; सेल्फीसुद्धा घ्यावासा वाटत नाही? हे सोपे पण प्रभावी व्यायाम करा आणि पाहा फरक
Freepik
Published on

सातत्याने बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन ही Double Chin (दुहेरी हनुवटी) येण्यामागची कारणे आहेत. Double Chin म्हणजे साधारण हनुवटी खालची जबड्याची रेषा असते त्या भागात फॅट वाढल्यामुळे फुगवटा येतो. त्यामुळे सौंदर्य बिघडते. अनेकांना तर या Double Chin मुळे तर सेल्फी घ्यायचीही इच्छा होत नाही. तुम्ही सुद्धा या Double Chin मुळे त्रस्त आहात का? तर बसल्या जागी करू शकता असे सोपे व्यायामप्रकार इथे दिले आहेत. ते ट्राय करून पाहा

चेंडूचा व्यायाम (Ball Exercise)

तुमच्या हनुवटीखाली टेनिस बॉल किंवा कोणताही छोटा बॉल ठेवा. आता तुमच्या हनुवटीने बॉल हलके दाबा आणि १० सेकंद धरून ठेवा. हे १०-१५ वेळा रिपीट मोडमध्ये करा. या व्यायामामुळे दुहेरी हनुवटीची चरबी झपाट्याने कमी होते आणि जबड्याचे स्नायू मजबूत होतात.

Chin किंवा हनुवटी उचलण्याचा व्यायाम (Chin Lift Exercise)

हा व्यायाम खूपच प्रभावी आहे. मान वर करून आकाशाकडे पाहा. नंतर तुमचे ओठ बाहेच्या दिशेला ओढा. एखाद्या पक्षाच्या चोचीप्रमाणे ओठ बाहेर काढा. या स्थितीत १० सेकंद थांबा. नंतर सामान्य स्थितीत परत या. हा व्यायाम किमान १० ते १५ वेळा करा. या व्यायामामुळे मान आणि हनुवटीच्या स्नायूंना टोन मिळतो आणि दुहेरी हनुवटी कमी होण्यास मदत होते.

जीभ दाबण्याचा व्यायाम (Tongue Press Exercise)

दुहेरी हनुवटी टोन करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. हे करण्यासाठी, तुमची जीभ तुमच्या तोंडाच्या टाळूला चिकटवा आणि तुमची मान वर उचला. आता तुमची जीभ दाबताना, तुमची मान थोडी वर आणि खाली हलवा. हे १०-१५ वेळा पुन्हा करा. या व्यायामामुळे जबड्याचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

जबड्याचे स्नायू ताणणे (Jawline Stretching)

तुमची मान सरळ ठेवा आणि तुमचा जबडा हळूहळू एका बाजूला पसरवा. आता तुमचा खालचा जबडा थोडा पुढे सरकवा आणि ५ सेकंद या स्थितीत रहा. आता दुसऱ्या बाजूलाही हीच प्रक्रिया पुन्हा करा. हे कमीत कमी १० वेळा करा. हा व्यायाम मानेवरील चरबी कमी करण्यासाठी आणि जबड्याची रेषा वाढवण्यासाठी प्रभावी आहे.

माशांच्या चेहऱ्यासारखा व्यायाम (Fish Face Exercise)

हे करण्यासाठी, तुमचे गाल आत खेचा आणि ओठांना बाहेर ढकला. आता ५-१० सेकंद या स्थितीत रहा. आता सामान्य स्थितीत या आणि ते १०-१५ वेळा पुन्हा करा. या व्यायामामुळे चेहऱ्याचे स्नायू टोन होतात आणि जबड्याची रेषा तीक्ष्ण होते.

logo
marathi.freepressjournal.in