
सध्याची जीवनशैली अवेळी आहार, पौष्टिक नसलेला आहार, आरोग्यासाठी हानिकारक तेलात तळलेले पदार्थ खाणे या सर्वांमुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना उच्च कोलेस्ट्रॉलच्या आजारामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच हृदयाच्या आरोग्याचीही चिंता वाढत आहे. तुम्हालाही उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करायलाच हवा.
दालचिनी
दालचिनी हा एक स्वादिष्ट मसाला आहे जो कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकतो. हे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करते. तुम्ही दालचिनी चहा, कॉफी किंवा इतर गोष्टींमध्ये मिसळून घेऊ शकता.
त्रिफळा
त्रिफळा हे हिरडा, आवळा आणि बेहडा या तीन फळांचे मिश्रण आहे आणि आयुर्वेदात त्याचे खूप महत्त्व आहे. त्रिफळा पचन सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. आयुर्वेदात त्रिफळाला पचनशक्ती सुधारण्यासाठी सर्वोत्तम औषध मानले आहे. त्रिफळा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि धमन्या स्वच्छ ठेवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.
लसून
हृदयाच्या आरोग्यासाठी लसूण सर्वोत्तम मानले जाते ते त्याच्या गुणधर्मांमुळे. लसूण हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करते. आहारात लसणाचा समावेश केल्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयावरील दाब कमी होतो. दररोज सकाळी थोडा लसून भाजून खाणे उत्तम असते.
हळद
हळद ही आयुर्वेदात सर्वोत्तम औषध मानले गेले आहे. हळदीचे अनेक उपयोग अनादी काळापासून भारतात केले जात आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक आढळतो, जो त्याच्या शक्तिशाली औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. हळद धमन्यांच्या भिंती निरोगी ठेवण्यास आणि प्लेक जमा होण्यास प्रतिबंध करण्यास देखील मदत करते. तुम्ही तुमच्या भाज्या, डाळी किंवा दुधात हळद मिसळून पिऊ शकता.
आले
आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा घटक असतो, ज्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या चहामध्ये आले घालू शकता किंवा ते मधासह कच्चे देखील खाऊ शकता. याशिवाय सर्दी खोकला झाल्यास आलेपाक वडी देखील खाऊ शकता. आल्याचं चाटण देखील करू शकता.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)