शरीरातील वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय? 'हे' उपाय नक्की करून पाहा

वाढत्या उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
शरीरातील वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय? 'हे' उपाय  नक्की करून पाहा
Published on

अनेकांना शरीरातील वाढत्या उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. शरीरात उष्णतेचे प्रमाण जास्त असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं, शरीरात खाज सुटण्याचे प्रमाण वाढत जाते. तसेच लघवीच्या जागेवर आग होण्यास सुरुवात होते. अश्या वेळी हे दुखणे लवकर दूर होण्यासाठी काही घरगूती उपाय करणे तर आवश्यक आहे. आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूया

  • आपल्या आहारात शीत आहारात दूध, दही, तुपाचं सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्यानं पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं. आहारात ताक घेताना त्यात पुदिना, धणे-जीरे पूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो. रोज रात्री तळपाय, हाताला तेल लावून वाटीनं पाय घासावेत, यामुळे झोप शांत लागते. हाता-पायाची उष्णतेनं होणारी जळजळही कमी होते. जळवात होत असेल तर रक्त चंदनाचा लेप उगाळून लावावा. रक्त चंदन उगाळून पाण्यातून घेतल्यानंही त्याचा फायदा होतो.

  • दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा अथवा तुळशीचं बी घ्यावं. शरीरात गारवा टिकून राहण्यासाठी रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर शरीराला मदत होते. रोज सकाळी नुसतं लिंबूपाणी प्यायल्यानं शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स निघून जातात. मात्र हे सुरू केल्यानंतर चहा-कॉफी घेणं टाळावं. फळं, फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा. याशिवाय उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवणं टाळावं.

  • आहारात पेज किंवा शक्यतो हलका आहार घ्यावा. अति तेलकट, तिखट, फास्टफूडसारखे पदार्थ टाळावेत ज्यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते. पित्तासाठी आमसुलाची कढी, आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम साखरेत घालून ते रोज एक चमचा खाल्ल्यानंही त्रास कमी होतो. नाचणी थंड असल्यानं आंबिल, नाचणी, तांदळाची भाकरी किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी. तसेच दिवसभर भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in