पोटाशी संबंधित तक्रारींशी त्रस्त आहात?'ही' फळं खा

पोटाशी संबंधित आरोग्याचे कोणत्याही कारणामुळे नुकसान होत असेल तर 'हे' फळे खा.
पोटाशी संबंधित आरोग्याचे कोणत्याही कारणामुळे नुकसान होत असेल तर 'हे' फळे खा.
पोटाशी संबंधित आरोग्याचे कोणत्याही कारणामुळे नुकसान होत असेल तर 'हे' फळे खा.
Published on

केळी-

केळी हे अनेकांच्या आवडीचे फळं, त्यामुळे बहुतेक जण केळीचा आहारात समावेश करतात, या फळामध्ये फायबरचे प्रमाण हे जास्त असते. फायबरयुक्त केळी खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. केळी खाल्ल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते त्यामुळे गॅसची समस्या दूर होते. केळी रोजच्या आहारामध्ये खाल्ल्यास पोटाशी संबंधित कोणतीही आरोग्यविषयक तक्रार दूर होण्यास मदत मिळते.

कलिंगड-

भरपुर पाणी प्या हे सतत आपण ऐकत असतो, शरीरात पाण्याची कमतरता असणे हे कोणत्याही आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यात पोटाशी संबंधित अनेक विकारांना डिहायड्रेशनची स्थिती कारणीभूत असू शकते. कारण यामुळे पोटात गॅस तयार होतो. तसेच अ‍ॅसिडिटीदेखील होऊ शकते. अशा स्थितीत जर कलिंगडाच्या फळाचे काळे मीठ टाकून सेवन केले तर बराच फायदा होतो. एकतर शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि पोटात गॅस होत नाही. यामुळे उन्हाळ्यात दिवसातून किमान एकदा कलिंगडचे सेवन करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

किवी-

किवी हे असे फळ आहे जे शरीरातील पांढऱ्या पेशींची कमतरता भरून काढण्याचे सामर्थ्य ठेवते. त्यामुळे किवीतील अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आरोग्यासाठी उत्तम लाभ होतो. म्हणून किवीचे सेवन करण्याबाबत डॉक्टर सांगतात, पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी किवीतील अनेक गुणधर्म लाभदायी आहेत. यासाठी किवीचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे.

स्ट्रॉबेरी-

थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारी स्ट्रॉबेरी पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने पोटात गॅसची समस्या होत नाही. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिकरित्या मधुर साखरेचा समावेश असतो. यामुळे स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तातील साखरेवर मोठा परिणाम होत नाही. शिवाय यात असलेले फायबर हे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करते. तसेच दिवसातून किमान एकदा याचे सेवन केल्यास अन्नपचन होण्यास मदत मिळते.

काकडी-

सर्वसाधारणपणे काकडीमध्ये तब्बल ९६% पाण्याचे प्रमाण असते. यामुळे काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सहाय्य मिळते. याशिवाय काकडीचे नियमित आहारात सेवन केल्याने पोटाशी संबंधित आजार दूर राहतात. कारण काकडी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि फायबरची कमतरताही दूर होते. परिणामी पोटाच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींची उत्पत्ती होत नाही.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in