
उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. घरातून बाहेर पडणे कठीण होत आहे. अशा कडक उन्हात बाहेर पडल्याने उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. उष्माघातामुळे अशक्तपणा वाढतो. शरीर कमजोर होते. उष्माघात टाळण्यासाठी आहारात काही पदार्थांचा नियमित समावेश करायला हवा. यामुळे उष्माघाताच्या त्रासासह उन्हाळ्यातील अन्य समस्याही दूर होतात. (Summer Health Tips)
कच्चा कांदा
उन्हाळ्यात दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघातापासून बचाव होतो. त्यात काही एंजाइम असतात जे उष्माघाताचे परिणाम कमी करतात. कच्चा कांद्याचे ठाराविक प्रमाण दुपारच्या जेवणात असायला हवे. रात्रीच्या आहारात मात्र, कच्चा कांदा टाळणे योग्य असते.
कैरीचं पन्हं
कैरीचं पन्हं किंवा आम पन्ना हे उन्हाळ्यातील एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे. यामुळे कच्च्या आंब्यातील अर्थात कैरीच्या गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात याचे विशेष फायदे होतात. यामुळे उष्माघात तर टाळता येतोच शिवाय शरीर हायड्रेटेड देखील राहते. (Summer Health Tips)
बेलाचे सरबत
बेलाचे सरबत हे नैसर्गिकरित्या थंड गुणधर्माचे आहे. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला गारवा प्रदान होतो. त्यामुळे तुम्हाला उष्माघाताचा त्रास होत नाही.
गुलकंद
गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखर यांच्यापासून बनवलेला गुलकंद शरीरासाठी फारच गुणकारी आहे. गुलकंदामुळे ज्यांना फार जास्त घाम येण्याची समस्या असते. गुलकंदामुळे ही समस्या दूर होते. शिवाय अशक्तपणा आणि थकवाही निघून जातो. गुलकंदामुळे उष्माघाताचा त्रास होत नाही. (Summer Health Tips)
नारळ पाणी
नारळ पाणी हे निसर्गाने दिलेले वरदान आहे. नारळ पाणी चुटकीसरशी शरीराला हायड्रेट करते. अशक्तपणा घालवून शरीराला ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे उष्माघाताशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि त्रास टाळता येतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)