
उन्हाळ्यात तीव्र उनामुळे त्वचेची चांगली काळजी घेणे हे एक आव्हानच असते. त्यातही उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर हा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. इथे तुम्हाला उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही सोप्या स्टेप्स सांगत आहोत. या स्टेप्स कोरडी, तेलकट किंवा अन्य कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरी तुम्ही त्या फॉलो करून उन्हाळ्यात आपली त्वचा सुंदर ठेवू शकतात.
सौम्य क्लिंजर
क्लिजंर हे त्वचेला खोलवर जाऊन स्वच्छ करते. बाजारात अनेक प्रकारचे क्लिंजर उपलब्ध आहेत. मात्र, यामध्ये काही हार्ड क्लिंजर असतात. तुम्हाला सौम्य क्लिंजरची निवड करायची आहे. त्वचेतील नैसर्गिक ओलावा अडथळा न काढता घाम, जास्त तेल आणि अशुद्धता काढून टाकण्यासाठी सकाळी सौम्य, सल्फेट-मुक्त क्लिंजरचा उपयोग करून दिवसची सुरुवात करा. तेलकट तसेच मिश्र त्वचेसाठी फोमिंग किंवा जेल-आधारित क्लिंजर चांगले असते. तर कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेसाठी, ग्लिसरीन किंवा हायल्यूरॉनिक अॅसिडसारख्या घटकांसह हायड्रेटिंग क्लिंजर सर्वोत्तम काम करते.
रिफ्रेशिंग टोनर (पर्यायी परंतु फायदेशीर)
तुमचा चेहरा स्वच्छ केल्यानंतर, रिफ्रेशिंग टोनरचा वापर करा. ते त्वचेचे पीएच संतुलित करण्यास मदत करते. उन्हाळ्यात, टोनर हायड्रेशनचा अतिरिक्त थर तयार करतो. जेणेकरून त्वचेवरील तेल नियंत्रित करण्यास मदत मिळू शकते. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तिंनी अल्कोहोल-मुक्त टोनरचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच कोरडी त्वचा असलेल्यांनी गुलाबपाणी किंवा हायल्यूरॉनिक अॅसिड असलेले हायड्रेटिंग टोनर निवडू शकतात.
हलके सीरम
टोनर नंतर, हलके सीरम वापरा. सीरम त्वचेत खोलवर सक्रिय घटक पोहोचवतात. उन्हाळ्यात, हलके, नॉन-ग्रीसी सीरम वापरा. तुमच्या सकाळी बाहेर पडण्यापूर्वी उन्हापासून त्वचेचे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त सीरमचा उपयोग करा. यामुळे तुमचा रंग देखील उजळेल. तसेच नियासिनमाइड किंवा हायल्यूरॉनिक अॅसिड असलेले सीरम रात्री वापरावे.
मॉइश्चरायझर
उन्हाळ्यातही, मॉइश्चरायझिंग करणे आवश्यक आहे. ते वगळल्याने तुमची त्वचा अधिक तेल तयार करू शकते. म्हणून, सीरम नंतर, तुमच्या चेहऱ्यावर हलक्या प्रमाणात मॉइश्चरायझर लावा. तेलकट किंवा मिश्र त्वचा असलेल्यांनी तेलमुक्त, जेल-आधारित मॉइश्चरायझरचा उपयोग करावा. कोरडी त्वचा असलेल्यांनी हलक्या क्रीमची निवड करावी ज्यामध्ये सिरामाइड्स किंवा स्क्वालेन सारखे हायड्रेटिंग घटक असतात.
ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन (AM)
मॉइश्चरायझिंगनंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन केवळ कडक उन्हापासून संरक्षण देत नाही तर हे अँटी एजिंगही आहे. तसेच यामुळे त्वचेच्या कर्करोगापासूनही तुम्हाला संरक्षण मिळेल. उन्हाळ्याच्या महिन्यांत, ३० किंवा त्याहून अधिक SPF असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन योग्य असते. उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी ठाराविक वेळेनंतर सनस्क्रीन पुन्हा लावू शकता.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)