
उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. उन्हाळा उकाड्याने कितीही हैराण करणारा असला तरी उन्हाचे फायदेही खूप असतात. आपल्या शरीराला वेगवेगळ्या Vitamin ची आवश्यकता असते. यापैकी Vitamin D हे अत्यंत आवश्यक असलेले Vitamin आहे. हे तुमच्या हाडांना बळकट करते. ज्यामुळे कंबर दुखी, मान दुखी, सांधे दुखी, गुडघे दुखी यांसारखे आजार दूर होतात. Vitamin D च्या कमतरतेने हे सर्व आजार बळावतात. जाणून घ्या Vitamin D चा उत्तम स्रोत काय आहे. तो कोठून मिळवणार आणि औषधांवरचा खर्च कसा कमी होईल?
काय आहे Vitamin D चे महत्त्व?
शरीराचे सर्व अवयवांनी उत्तम हालचाल करता यावी. उठता बसता गुडघे दुखी, कंबर दुखी, मान दुखी, सांधे दुखी होऊ नये असे वाटत असेल तर त्यासाठी तुमच्या शरीरात Vitamin D हे योग्य प्रमाणात असायला हवे. यामुळे शरीरातील संपूर्ण हाडांचे बळकटीकरण होते. अशक्तपणा जातो. थोडेसे काम केल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखे होत असेल किंवा खूप जास्त थकवा जाणवत असेल तर त्यासाठी देखील Vitamin D ची तुमच्या शरीरात आपूर्ती होणे आवश्यक आहे.
Vitamin D च्या कमतरतेची लक्षणे
थकवा येणे, हाडांचे दुखणे, केस गळणे, सारखे-सारखे आजारी पडणे, मूड स्विंग होणे, चांगली झोप न येणे, स्नायू कमकुवत होणे, त्वचा रूक्ष होणे, वजन वाढणे ही Vitamin D च्या कमतरतेची लक्षणे आहेत.
कोणत्या आहारातून Vitamin D ची कमतरता भरून काढू शकता?
Vitamin D हे दूध, दही, पनीर, मासे, अंड्यातील पिवळा बलक, मशरूम, ऑरेंज ज्यूस आणि सोया मिल्क इत्यादींमधून भेटू शकते.
Vitamin D मिळवण्यासाठी उन्हाळ्याचा फायदा कसा घेणार?
ऊन्हाळ्यात दुपारच्या कडक उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता असली तरी सकाळचे कोवळे ऊन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ते Vitamin D चा सर्वोत्तम स्रोत आहे. त्यामुळे गुडघे, कंबर, मान यांना सकाळच्या कोवळ्या उन्हात शेकणे हा खर्च नसलेला उत्तम उपाय आहे. कोवळ्या सूर्यकिरणातून हाडांना मजबूत करणारे Vitamin D मिळते. त्यामुळे उन्हाळ्याचा फायदा घ्यायला हवा.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)