घरच्या घरी राखा त्वचेची निगा, फॉलो करा या सोप्या टिप्स

घरच्या घरी राखा त्वचेची निगा, फॉलो करा या  सोप्या टिप्स

ऋतू बदलला की त्वचेच्या समस्या निर्माण व्हायला लागतात, मग प्रश्न पडतो तो म्हणजे त्वचेची काळजी कशी घ्यायची. नेहमी पार्लरमध्ये जाऊन महागड्या क्रिम, थेरपी करने परवडणारं नसतं. अश्यावेळी घरच्या घरी केल्या जाणाऱ्या उपायांमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते. हेच तेज मिळवण्यासाठी पाहू या अशाच काही अगदी सोप्या स्किन केअर टिप्स!

कोल्ड क्रीम मसाज

रात्री झोपताना न विसरता कोमट पाण्याने हातपाय आणि चेहरा धुवून तुम्हाला आवडणाऱ्या ब्रॅंडचं कोल्ड क्रीम किंवा मॉन्शरायझर लावा. पाच मिनिटं छान मसाज करा.

बदाम तेलाचा वापर

झोपताना बदामाचं शुद्ध तेलाचे थोडे थेंब बेंबीत सोडावेत. हे केल्याने संपूर्ण शरीराला आतून फायदा होतो. केसांसाठी फार छान उपयोग होतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. 

तांदळाचं पाणी

रोजचा कुकर लावताना तांदूळ धुतलेलं पाणी साठवून ठेवायचं. त्याने चेहरा धुवावा. हे तांदळाचं धुवण उत्तम असं क्लिन्झरआहे. चेहऱ्यावरचे पिंपल्स, तेलकटपणा यासाठी हे पाणी  उपयुक्त आहे.

गरम पाणी पिणे

 रोज ब्रश करुन झाल्यावर कोमट पाणी प्यायचं. दिवसाची सुरुवात आणि शेवट कोमट पाणी पिणे या सवयीमुळे फार चांगला फरक पडतो.

ताजं फळ खाणे

 रोज एक रसदार फळ न विसरता दिवसाउजेडी खायचं. शक्यतो नाश्ता केल्यानंतर आणि दुपारच्या जेवणाच्या तासभर आधी डाळिंब, सफरचंद, संत्रं, मोसंबं अशी रसदार फळं खावीत. ताजी फळं खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे असे आवश्यक ते घटक मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते.

त्वचा मऊ करणे

बरेचदा कोपर आणि पायाच्या घोट्याची त्वचा निबर होऊन काळवंडलेली दिसते. चमचाभर कॉफीपूड, चमचाभर आंबेहळद दोन चमचे कोरफडीच्या जेलमध्ये मिसळून लावत राहिलं की उत्तम गुण येतो. 

चेहऱ्यावरचे ब्लॅक हेडस

नाकावर खूप ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स झाले असतील तर छोटा चमचाभर टूथपेस्ट तेवढ्याच कणकेत मिक्स करुन नाकावर आणि बाजूच्या त्वचेवर सात आठ मिनिटं लावून ठेवायची. नंतर अर्धा मिनिट चोळून मसाज करुन धुवून टाकायचं. मस्त फरक पडतो. 

बरेचदा कोपर आणि पायाच्या घोट्याची त्वचा निबर होऊन काळवंडलेली दिसते. चमचाभर कॉफीपूड, चमचाभर आंबेहळद दोन चमचे कोरफडीच्या जेलमध्ये मिसळून लावत राहिलं की उत्तम गुण येतो. 

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in