चेहऱ्यावर ब्लीच करताना ‘हि’ घ्या काळजी

घरगुती पद्धतीने ब्लीच करतो तेव्हा त्यासाठी कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया….
चेहऱ्यावर ब्लीच करताना ‘हि’ घ्या काळजी

प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची आपल्या परीने काळजी घेत असतो. काही महीला घरच्या घरी वेगवेगळे उपाय करतात तर काही महिला या आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असतात. ब्लीच करणे असो किंवा चेहऱ्याच्या इतर काही वेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट असो. पण ज्यावेळी आपण घरगुती पद्धतीने ब्लीच करतो तेव्हा त्यासाठी कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया….

  • प्रथम आपला चेहरा हा स्वच्छ करून घ्या.

  • चेहऱ्याला स्वच्छ आणि तजेल बनविण्यासाठी ब्लीच एक चांगला पर्याय आहे. ब्लीच आपले अवांछित केस लपविण्यासह त्वचेमध्ये सोनेरी चमक आणते.

  • ब्लीचचा वापर हात, पाय, पोटावर वॅक्सचा पर्याय म्हणून केला जाऊ शकतो.

  • लक्षात ठेवा की ब्लीचमध्ये अमोनियाचे प्रमाण दिलेल्या सूचनांनुसारच घाला. अमोनियाचे जास्त प्रमाण आपल्या चेहऱ्याला इजा करू शकतात.

  • ब्लीच चेहऱ्यावर लावताना डोळ्यांवर किंवा भुवयांवर लागणार नाही, याची काळजी घ्या.

  • सध्या बाजारपेठेत ब्लीच बऱ्याच प्रकारांच्या कंपन्यांचे मिळतात, यांचा ट्रायल पॅकचा वापर आपण आपल्या त्वचेवर वापरू शकता.

  • जे आपल्या त्वचेला सूट होईल अश्या पद्धतीचेच ब्लीच आपण वापरले गेले पाहिजे.

  • डब्यावर दिलेल्या सूचनांनुसारच ब्लीच मध्ये अमोनिया पावडरचे प्रमाण घालावं.

  • क्रीम आणि पावडरच्या मिश्रणाला आधी हाताच्या कोपऱ्याला किंवा इतर जागी लावून बघा.

  • त्वचेवर जळजळ होत असल्यास मिश्रणात क्रीमाचे प्रमाण वाढवावं आणि अमोनियाचे प्रमाण कमी ठेवावे.

  • नेहमीच चांगल्या ब्रँडेड कंपनीचे ब्लीच वापरावं.तसेच ब्लीच हे जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नये.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in