
फाल्गून महिना संपत आला आहे. गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्र जवळ येत आहे. चैत्र नवरात्रीला देखील शारदीय नवरात्रीप्रमाणे अनेक जण नऊ दिवस उपवास करतात. उपवास करताना काही जण खूप कडक उपवास करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. मात्र, योग्य काळजी न घेतल्या अशक्तपणा, थकवा जाणवू शकतो. उपवासात काय खाणार काय नाही, जाणून घ्या नवरात्रीतील योग्य आहार...
योग्य आहार घ्या...
उपवास करणे शरीराला चांगले असते. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. मात्र, नवरात्रीचे उपवास फार कठीण असतात. हे सलग नऊ दिवस करायचे असतात. उपवासात शरीराला पोषण मिळेल असा एकदम हलका आहार घ्यावे. विशेष करून फळे खावीत. त्यातही चैत्र महिन्यात उन्हाळा असल्याने टरबूज-खरबूज यांसारखी पाणीदार फळे खावीत.
पाणी पिणे
उपवास करताना पाणी योग्य प्रमाणात पिणे आवश्यक आहे. पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवेल. त्यामुळे तुम्हाला चक्कर येणार नाही, डोकेदुखी होणार नाही. तसेच अशक्तपणा जाणवणार नाही.
सरबत आणि फळांचा रस घ्या
उपवासाच्या काळात सबरत किंवा फळांचा रस घेणे चांगले असते. यामुळे तुम्हाला भूकेची जाणीव होणार नाही. लिंबू सरबत, ताज्या फळांचा रस यामुळे अशक्तपणा होणार नाही.
सुका मेवा आणि फळे
उपवासाच्या काळात सुका मेवा आणि फळे हे तुमच्या शरीराला पोषक तत्वे प्रदान करतील. दिवसभरातून किमान एकदा तरी सुका मेवा खायला हवा. सुका मेवा खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही न थकता दररोज काम करू शकता.
दुधाचे सेवन
उपवासात दूध आणि दुधाचे पदार्थ घेणे चांगले असते. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. तसेच दूध हे शरीराला शक्ती प्रदान करते. तसेच त्यात अनेक व्हिटामिन्स असतात. हे सर्व व्हिटामिन दुधातून मिळतात.
काय खाऊ नये?
उपवासाच्या दिवसात शक्यतो तळलेला आहार खाणे टाळावे. कारण उन्हाळ्यामुळे आणि शरीरात अन्य अन्नघटक नसल्यामुळे मळमळ होणे, उलटी होण्यासारखा त्रास संभवू शकतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)