रिकाम्या पोटी चहा घेणे घातकच !

रिकाम्या पोटी घेतलेला चहा आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो.
रिकाम्या पोटी चहा घेणे घातकच !

चहा घेतल्याने तरतरी येते किंवा टॉनिक घेतल्यासारखे वाटते असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र, रिकाम्या पोटी घेतलेला चहा आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो. काश्मीरमधील कावा असो किंवा ग्रीन टी आणि लेमन टी आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. आलं, तुळस, लवंग, वेलची आणि दालचिनी यांसारखे पदार्थ घालून केलेला आरोग्यदायी चहाही उत्तम. मात्र, चहा पावडर आणि दूध घालून केलेला चहा तोही रिकाम्या पोटी घेतल्यास तो आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते. चहामुळे कोणते दुष्परिणाम होतात पाहूया...

रिकाम्या पोटी चहा पिण्याने पचनतंत्र बिघडते. पोट रिकामे असताना चहा घेतल्यास शरीरातील आम्ल अचानक उसळते आणि त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. अ‍ॅसिडिटीमुळे इतर अनेक समस्या उद्भवतात.

■ रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटातील अग्नी मंदावतो. त्यामुळे पुढचा बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपण पोषणापासून वंचित राहतो. शरीराचे योग्य पोषण न झाल्याने प्रतिकारशक्ती कमी होते.

• चहा अति उकळलेला असल्यास तो आतड्यांसाठी आणि पोटातील इतर अवयवांसाठी चांगला नसतो. चहामधील कॅफेन रिकाम्या पोटासाठी घातक असते. त्यामुळे शक्यतो रिकाम्या पोटी चहा घेणे टाळावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in