
आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. मात्र, अनेकांना आंघोळ केल्यानंतर शरीराला खाज सुटण्याचा त्रास असतो. अनेक वेळा क्लोराईड मिक्स पाणी, बोरचे पाणी किंवा जड पाणी यामुळे यागोष्टी होतात. तसेच अन्य काही कारणेही या पाठीमागे आहेत. आंघोळीनंतर खाज सुटणे बंद होण्यासाठी एक साधा सोपा पर्याय आहे. हा पर्याय पारंपारिकरित्या पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. जाणून घ्या सविस्तर...
तुरटी
तुरटी हा पांढरा दिसणाऱ्या एक क्रिस्टल पदार्थ आहे. तुरटीचे ही त्वचारोगांसाठी आणि केसांसाठी उत्तम मानली जाते. तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा अनादी काळापासून उपयोग केला जात आहे.
आंघोळीच्या पाण्यात तुरटी कशी वापरावी
तुरटीचा खडा पाण्यातून दोन मिनिटे फिरवा. अर्ध्या ते एक तासाने पाण्यातील सर्व घाण तळाशी बसेल वरचे शुद्ध पाणी तुम्ही आंघोळीला तसेच पिण्यासाठी उपयोगात आणू शकता. याशिवाय तुरटीची पावडर पाण्यात घालून ठेवावी. नंतर हे पाणी गाळून त्याचा उपयोग करावा. तुरटीचा नियमित उपयोग केल्याने आंघोळीनंतर अंगाला येणारी खाज हळूहळू बंद होईल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)