फ्रूट सॅलड, मिल्कशेकमुळे त्वचेचे आजार होतात! जाणून घ्या आयुर्वेद काय सांगते? काय आहे नेमके कारण?

फळ खाणे हे आरोग्यासाठी खूप उत्तम असते. फळांमधून अनेक प्रकारचे जीवनसत्त्व, पोषकतत्व, खनिजद्रव्य मिळतात. वेगवेगळ्या आजारांवर फळं खाणं हे उत्तम औषध असते. मग फ्रूटसॅलडमुळे त्वचेचे आजार कसे होऊ शकतात? काय सांगते आयुर्वेद, चला जाणून घेऊया सविस्तर पद्धतीने...
फ्रूट सॅलड, मिल्कशेकमुळे त्वचेचे आजार होतात! जाणून घ्या आयुर्वेद काय सांगते? काय आहे नेमके कारण?
Freepik
Published on

फळ खाणे हे आरोग्यासाठी खूप उत्तम असते. फळांमधून अनेक प्रकारचे जीवनसत्त्व, पोषकतत्व, खनिजद्रव्य मिळतात. वेगवेगळ्या आजारांवर फळं खाणं हे उत्तम औषध असते. मग फ्रूटसॅलडमुळे त्वचेचे आजार कसे होऊ शकतात? काय सांगते आयुर्वेद, चला जाणून घेऊया सविस्तर पद्धतीने...

तुम्हाला चेहऱ्यावर पुटकूळ्या येणे, त्वचेला खाज येणे, चेहऱ्यावर मुरुमं येणे असे त्रास होत आहे का? असे असेल तर याचे कारण उत्तम डाएटच्या नावाखाली फ्रूटसॅलड आणि फळांपासून तयार केलेले मिल्कशेकचे सेवन करण्यामध्ये दडलेले असू शकते. तुम्हाला ही गोष्ट निश्चितच चकित करू शकते की फ्रूटसॅलडमध्ये तर फळे असतात आणि फळे ही आरोग्याला चांगली असू शकतात. मग फ्रूट सॅलडमुळे त्वचेचे आजार कसे काय होऊ शकतात? मात्र, याचे उत्तर अगदी सोपे आहे विरुद्ध आहार आणि फ्रूट सॅलड बनवण्याची चुकीची पद्धत.

विरुद्ध आहार म्हणजे काय?

विरुद्ध आहार म्हणजे ज्याचे गुणधर्म परस्पर विरोधी आहेत. मात्र, तुम्ही तो एकत्रितरित्या आहारात समावेश करतात. त्याला विरुद्ध आहार असे म्हणतात. आयुर्वेदानुसार परस्पर विरुद्ध गुणधर्माची फळं तुम्ही फ्रूट सॅलडमध्ये एकत्र करून खाल्ल्यामुळे या आहारातून शरीरात विषारी द्रव्य तयार होतात. यामुळे त्वचेचे विविध आजार होतात. केवळ त्वचेचे आजारच नाही तर यामुळे विविध प्रकारचे कँसर तर मेंदू विकारही होऊ शकतात.

फ्रूट सॅलड

फ्रूट सॅलड किंवा फ्रूट फ्लेटमध्ये तुम्ही एकाच वेळी टरबूज, खरबूज, द्राक्षे, पपई, गाजर, चिक्कू, आंबा ही सर्व फळे एकत्र करून त्यांचा समावेश आहारात करता. पपई, आंबा हे अतिशय उष्ण आहेत तर टरबूज खरबूज हे थंड गुणधर्माचे आहे. मग, थंड आणि उष्ण गुणधर्मांचे पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात विषारी घटकद्रव्य तयार होतात.

दूध आणि फळे एकत्र विषसमान

आयुर्वेदानुसार कोणतेही फळ आणि दूध हे एकत्ररित्या घेणे हे विषसमान असते. फ्रूट सॅलड किंवा फळांपासून बनवलेले मिल्कशेक हे देखील विरुद्ध आहार असते. अगदी केळीचं शिकरण हा परंपरागत पदार्थ देखील कधीतरीच खावा असा संकेत आहे.

योग्य फ्रूट सॅलड कसे करावे

त्यामुळे फ्रूट सॅलड बनवताना समान गुणधर्म असणारी फळे एकत्र करा किंवा कोणत्याही एकाच फळाचा सॅलड म्हणून आहारात समावेश करावा. तसेच मिल्कशेक बनवताना फळांपासून तो तयार करू नये. त्याऐवजी केवळ बदाम शेक तयार करावा. फळांचा ज्यूस घेताना त्यात दूध घालू नये. बिना दुधाचा ज्यूस तयार करावा.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in