‘या’ गोष्टींपासून नववधूंनी दूर राहावे

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नववधू-वर यांची लग्नासाठी तयारी जोरात सुरू असणार.
‘या’ गोष्टींपासून नववधूंनी दूर राहावे

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नववधू-वर यांची लग्नासाठी तयारी जोरात सुरू असणार. परंतु सुंदर दिसण्यासाठी नववधू विविध पद्धतीचे ब्युटी प्रोडक्ट‌्स वापरतात. त्यामुळे चेहऱ्याची स्कीन ही नितळ आणि सुंदर दिसते. मात्र चुकीच्या पद्धतीच्या ब्युटी टिप्स उपयोगात आणल्या तर ते चेहऱ्यासध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नववधू-वर यांची लग्नासाठी तयारी जोरात सुरू असणार.साठी घातक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्याची स्कीन नितळ आणि चमकदार ठेवायची असेल तर ‘या’ गोष्टींपासून नववधूंनी दूर राहणे आवश्यक आहे.

ऐन लग्नसराईवेळी जर नववधू चेहऱ्याच्या नितळ स्कीनसाठी इन्वेसिव ट्रिटमेंट घेत असेल तर ती त्वरित बंद करावी. तसेच केमिकल औषधे आणि लेजर तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहऱ्यावरील स्कीनचा नॅचलरपणा निघून जातो. त्यामुळे चेहऱ्याची स्कीन रुक्ष होण्याची शक्यता असते. काही नववधू लग्न होण्यापूर्वी इन्वेसिव ट्रिटमेंटचा उपयोग करतात. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जातो.

जर चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स आल्या असतील तर तरुणी वारंवार त्याकडे लक्ष देतात. तसेच चेहऱ्यावरील या पिंपल्सला सारखे हात लावल्याने चेहऱ्याच्या स्कीनला त्रास होतो. तर काही तरुणी पिंपल्स फोडतात. मात्र असे करू नका. असे केल्याने चेहऱ्यावर काळे डाग जाण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. या स्थितीत तरुणींनी स्कीन स्पेेशालिस्टचा सल्ला घेतल्यास उत्तम.

तुमच्या चेहऱ्याची स्कीन चांगली ठेवण्यासाठी उत्तम ब्रँन्डचे फेशियल करण्यास हरकत नाही. तसेच सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे पुरेशी झोप आणि खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवावे.

logo
marathi.freepressjournal.in