आयुष्यात यशोशिखर गाठायचंय? ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय लावा; होतात सकारात्मक बदल

तुम्ही कधी यशस्वी व्यक्तींची दिनचर्या पाहिली आहे का? आयुष्यात यशोशिखर गाठणाऱ्या अनेक व्यक्ती पहाटे लवकर उठतात. आपल्या भारतीय परंपरेत ब्रह्म मुहूर्तावर उठणे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आयुष्यात सुख-शांती आणि समृद्धी मिळवण्यासाठी ही फायदेशीर असते, असे सांगितले आहे. जाणून घ्या ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे काय आहेत फायदे...
आयुष्यात यशोशिखर गाठायचंय? ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय लावा; होतात सकारात्मक बदल
Freepik
Published on

तुम्ही कधी यशस्वी व्यक्तींची दिनचर्या पाहिली आहे का? आयुष्यात यशोशिखर गाठणाऱ्या अनेक व्यक्ती पहाटे लवकर उठतात. आपल्या भारतीय परंपरेत ब्रह्म मुहूर्तावर उठणे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आयुष्यात सुख-शांती आणि समृद्धी मिळवण्यासाठी ही फायदेशीर असते, असे सांगितले आहे. जाणून घ्या ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे काय आहेत फायदे...

ब्रह्म मुहूर्त म्हणजे नेमकी कोणती वेळ?

ब्रह्म मुहूर्त म्हणजे सामान्यपणे सुर्योदयापूर्वीचे दीड तास. ऋतूनुसार यामध्ये बदल होत राहतात. कारण सुर्योदयाची वेळ बदलत राहते. सामान्यपणे तुम्ही पहाटे ४.४५ ला उठला तर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठता.

पोटाचे आजार होत नाही

ब्रह्म मुहूर्तावर उठल्यामुळे पोटाचे आजार जडत नाही. याचे कारण पहाटेच्या वेळी हवा अत्यंत शुद्ध असते. तसेच वातविकार दूर करते. या हवेमुळे पोट व्यवस्थित साफ होते. आतडे स्वच्छ होतात. पहाटे शौच व्यवस्थित झाल्यामुळे संपूर्ण दिवस हलके वाटते. तसेच गॅसेस आणि अपचनाच्या समस्या होत नाही.

बुद्धी तल्लख होते

ब्रह्म मुहूर्तावर उठून अध्ययन केल्यामुळे बुद्धी तल्लख होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अतिशय उत्तम मानली जाते. तसेच कामाच्या ठिकाणी याचा उपयोग होतो.

सकारात्मकता वाढते

ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने तुमच्या मनातील नकारात्मक भाव निघून जातात. तुमच्यात सकारात्मकता वाढीस लागते. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील दैनंदीन कामकाज अधिक प्रभावी आणि कार्यक्षमतेने करता.

एकाग्रता वाढते

ब्रह्म मुहूर्त ध्यान करण्यासाठी अत्यंत उपयोगी असतो. यावेळी ऊर्जा अतिशय स्वच्छ असल्याने एकाग्रता वाढते. उत्तम ध्यान करता येते. याचे आध्यात्मिक फायदे होतात. मात्र, तुमच्या दैनंदिन कामकाजातही तुम्ही योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनता.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in