Washroom Facility : प्रवासादरम्यान अधून मधून लघवीला येणं सामान्य गोष्ट आहे. अशावेळी कित्येकांना उघड्यावर जावं लागतं. परंतु अशी परिस्थिती उद्भवल्यास महिलांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या महिला उघड्यावर जातात, त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. सामनाही करावा लागू शकतो. याशिवाय असं करणं प्रत्येकवेळी शक्य होत नाही. नागरिकांची हीच अडचण दूर व्हावा, याकरता एक खास कायदा करण्यात आला आहे. या कायद्याच्या आधारे तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जावून वॉशरूम वापरू शकता. एवढंच नाही तर कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही पाणीही पिऊ शकता.
अनेक जण थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वॉशरुमला जाण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. परंतु तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. द सराइज अॅक्ट १८८७ (The Sarais' Act) नुसार तहान लागल्यावर किंवा लघवीला लागल्यावर तुम्ही कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटचं टॉयलेट वापरू शकता. असं करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. बऱ्याचदा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वॉशरूमला गेल्यावर किंवा पाणी प्यायल्यावर तुमच्याकडून चार्ज घेतला जातो. परंतु या कायद्यानुसार तुम्ही मोफत पाणी पिऊ शकता तसेच टायलेटही वापरू शकता.
तर हॉटेलचा परवाना रद्द होऊ शकतो...
जर तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाणी पिण्यापासून किंवा टॉयलेट वापरण्यापासून रोखत असेल किंवा त्यासाठी चार्ज करत असेल तर तुम्ही या कायद्यानुसार त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. तक्रार दाखल होताच सदर हॉटेलच्या मालकाविरोधात कडक कारवाई केली जावू शकते. एवढंच नव्हे तर हॉटेलचा परवानादेखील रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही हॉटेलसमोर गाडी थांबवून तेथील वॉशरूम वापरू शकता.