खरंच! जगातील 'या' ५ देशांत एकही विमानतळ नाही...

आजच्या काळातही जगातील काही देशांमध्ये विमानतळ नाहीत. हो, हे खरंय जगात असे काही देश आहेत, जिथे आजही एकही विमानतळ नाही.
खरंच! जगातील 'या' ५ देशांत एकही विमानतळ नाही...

मुंबई: कमी वेळात जलद प्रवास करण्यासाठी लोक विमानानं प्रवास करतात. विमान प्रवासासाठी विमानतळ महत्त्वाची असतात. सध्या भारतात अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळं आहेत. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, आजच्या काळातही जगातील काही देशांमध्ये विमानतळ नाहीत. हो, हे खरंय जगात असे काही देश आहेत, जिथे आजही एकही विमानतळ नाही. आपण असे पाच देश पाहणार आहोत, ज्या देशांमध्ये विमानतळ नाही.

लिकटेंस्टाइन प्रिंसिपॅलिटी:

लिकटेंस्टाइन प्रिंसिपॅलिटी हा खुपच छोटा देश आहे आणि पर्वतीय क्षेत्र असल्यामुळं तिथं विमानतळ बनवणं खूपच अवघड आहे. या देशातील नागरिक बस किंवा कॅबच्या मदतीने दुसऱ्या देशाच्या एअरपोर्टवर जातात. या देशापासून सुमारे १२० किमी अंतरावर ज्यूरिक विमानतळ आहे.

एंडोरा:

स्पेन आणि फ्रान्सच्या दरम्यान एंडोरा हा छोटासा देश आहे. पर्वतीय भागात असल्यामुळं या देशातही विमानतळ नाही. एंडोरापासून ३० किमी अंतरावर कॅटेलोनियाचं 'एंडोरा-सा लियु' हे विमानतळ आहे.

मोनॅको प्रिंसिपॅलिटी:

मोनॅको प्रिंसिपॅलिटीमध्येही विमानतळ बनवणं शक्य नाही. या देशातील लोक शेजारच्या नाइस येथून प्रवास करतात.

व्हॅटीकन सिटी:

जगातील सर्वात लहान देश व्हॅटीकन सिटीमध्येही एअरपोर्ट नाही. हा देश रोमच्या मध्ये आहे. येथील लोक पायी किंवा गाडीनं प्रवास करतात. व्हॅटीकन सिटीचे लोक विमानप्रवास करण्यासाठी फियुमिसिनो आणि सियामपिनो विमानतळावर जावं लागतं.

सैन मरिनो:

या देशातही विमानतळासाठी योग्य अशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळं या देशात एकही एअरपोर्ट नाही. या देशातील लोक १६ किमी दूर रिमिनी एयरपोर्टमधून प्रवास करतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in