
एप्रिल महिना सुरू झाला आहे, आणि उष्णता जाणवू लागली आहे. यंदा फेब्रुवारी, मार्चपासूनच उन्हाच्या तडाख्याने जीव हैराण झालेला असतानाच एप्रिल ते जून या तीन महिन्यांत देशात सूर्य आणखी तापणार आहे. यंदा कडक उन्हाळ्याचा सामना देशवासीयांना करावा लागणार असून उष्णतेची लाट अनेक राज्यांना हैराण करणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या उष्णतेच्या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि शरीर थंड ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, रस पिणे आणि शरीराला थंड ठेवणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यातील उष्णतेच्या झळा लागायला सुरवात होते तेंव्हा पहिल्यांदा लिंबू हे फळ आपल्या मनात येते. गरम हवामानात लिंबूचे सेवन फायदेशीर आहे. त्यामुळे नियमितपणे लिंबूपाणी पिल्याने शरिराला अनेक फायदे् होऊ शकतात.
तुम्हाला माहीत आहे का? शरीर थंड ठेवण्याव्यतिरिक्त लिंबूपाणी पिल्याने इतरही अनेक आरोग्यदायी फायदे होतात ते कोणते एकदा नक्की वाचा.
पचन सुधारते
दररोज एक ग्लास लिंबूपाणी पिल्याने पचन सुधारण्यास मदत होते. जे की पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
हृदयाचे आरोग्य
लिंबू हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे, जो हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतो. तसेच, व्हिटॅमिन C हृदयरोगाशी संबंधित काही धोकादायक घटक कमी करण्यास आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
वजन कमी करण्यास मदत
लिंबूपाण्यात विरघळणारा पेक्टिन फायबर असतो, जो पोट भरल्यासारखे वाटायला मदत करतो आणि मेटाबॉलिझम वाढवतो, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
त्वचेसाठी फायदेशीर
लिंबाचा रस त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. मुरूमांपासून मुक्त होण्यासाठी नियमितपणे लिंबूपाणी प्या. तसेच, तुमच्या रोजच्या फेस क्रीममध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून लावल्याने त्वचा उजळ दिसू शकते.
केस गळतीपासून आराम
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन C असते, जे केसांसाठीही उपयुक्त आहे. लिंबाचा रस केसांच्या तेलात मिसळून लावल्याने कोंडा कमी होतो. तसेच, तो केसांच्या मास्कमध्ये मिसळल्यास केस गळती रोखण्यास मदत होते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)