बहुगुणी कोरफडीचे 'हे' होतात फायदे

खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे कोरफड हे रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते
 बहुगुणी कोरफडीचे 'हे' होतात फायदे

खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे कोरफड हे रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. कोरफडच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहऱ्‍याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी कोरफडचा रस लावल्याने फायदा होतो.

कोरफडच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा दूर होतो. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोरफडच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ट दूर होते. गुलाबपाण्यात कोरफडचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते. कोरफडच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड दूर होतात.

कोरफड सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे-केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते. कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो.

logo
marathi.freepressjournal.in