सोलो ट्रिपवर जाण्यासाठी भारतातील 'हे' ठिकाणं नेहमीच ठरतात बेस्ट

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही दोन ते तीन दिवसांत फिरून येऊ शकता.
सोलो ट्रिपवर जाण्यासाठी भारतातील 'हे' ठिकाणं नेहमीच ठरतात बेस्ट
Published on

कामाचा तणाव किंवा इतर जबाबदाऱ्या यातून बाहेर फिरण्यासाठी वेळ मिळत नाही, किंवा अनेकदा केलेले प्लान ही कॅन्सल होतात, अश्यावेळी तुम्ही सोलो ट्रिपवर जाऊ शकता. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही दोन ते तीन दिवसांत फिरून येऊ शकता.

जयपूर- गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाणारं जयपूर हे इथला शाही थाट, संस्कृती आणि पाहुणाचार या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे तर पर्यटक या गोष्टीमुळे जयपूरच्या प्रेमात पडतात. जयपुर हे केवळ कपल, ग्रुप ट्रिप्ससाठीच नाही तर सोलो ट्रिपसाठी नेहमीचे लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. त्यामुळे तुम्ही जयपूरला जाण्याचा प्लान करू शकता.

हिमाचल- पर्वतरांगा आणि हिरवळीने समृद्ध असलेली धर्मशाळा ही जागा सोलो ट्रिप करणाऱ्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. इथला निसर्ग, वातावरण तुम्हाला क्षणार्धात ताजंतवानं करतं. याठिकाणी वर्षभर पर्यटकांची ये-जा असते. इथली प्रत्येक जागा पिक्चर-परफेक्ट आहे.

मुन्नार, केरळ- या जागेला जरी भारतातील हनिमून डेस्टिनेशन मानलं जात असलं तरी याठिकाणी सोलो ट्रिप करण्याची गोष्टच निराळी आहे. चहाचे मळे, हिरवळ, निसर्ग पाहून तुम्ही मुन्नारच्या प्रेमात पडाल.

हरिद्वार-ऋषिकेश- ही दोन्ही ठिकाणी तुम्हाला अध्यात्मिक गोष्टींसाठींसह अ‍ॅडव्हेंचर करता येईल. विशेष म्हणजे स्वस्तात रेल्वे तिकिट घेऊन कमी किंमतीत चांगल्या हॉटेलमध्ये राहू शकता. गंगा किनारी केली जाणारी गंगा आरती आणि पर्वतांमधून होणारा प्रवास यांचा अनुभवच खास असतो. ऋषिकेशला तुम्ही रिव्हर राफ्टींग, बंजी जंपिंग, जाएंट स्विंगसुद्धा करू शकता.

logo
marathi.freepressjournal.in