उन्हाळ्यात केळीपासून बनवलेला 'हा' पारंपारिक पदार्थ रोगप्रतिकारकशक्तीला करतो 'डबल बूस्ट'

केळीपासून तयार केलेला हा एक सोपा पारंपारिक पदार्थ जो अवघ्या दोन मिनिटात बनवता येतो. त्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. काय आहे 'हा' पदार्थ चला जाणून घेऊ...
उन्हाळ्यात केळीपासून बनवलेला 'हा' पारंपारिक पदार्थ रोगप्रतिकारकशक्तीला करतो 'डबल बूस्ट'
Youtube - SAACHI KITCHEN MARATHI
Published on

केळी हे बारमाही सहज सर्वत्र उपलब्ध होणारे फळ आहे. अनेक लोकांच्या डाएटमध्ये केळीचा समावेश असतोच. केळी हे हिमोग्लोबीन वाढवणारे, झपाट्याने ऊर्जा प्रदान करणारे एक उत्तम फळ आहे. केळीचे वेफर्स संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये अनेक जण आवर्जून खातात. केळी वेफर्समधून देखील अनेक पौष्टिक तत्व शरीराला मिळतात. मात्र, केळीपासून तयार केलेला हा एक सोपा पारंपारिक पदार्थ जो अवघ्या दोन मिनिटात बनवता येतो. त्यामुळे तुमच्या आरोग्याला चौपट फायदे मिळेल. काय आहे हा पदार्थ चला जाणून घेऊ...

शिकरण

'मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण' या छोट्या बालगीतात शिकरण या पदार्थाबद्दल ऐकलं असेल. हल्ली लोक हा पदार्थ खायला विसरलेले आहेत. हा पदार्थ केळीच्या मिल्कशेक पेक्षाही जास्त उत्तम आणि पौष्टिक फायदे देणारा आहे.

कसे करतात शिकरण?

केळ्याचे शिकरण करणे अतिशय सोपे आहे. यासाठी दोन केळी आणि एक कप दूध, आवडत असल्यास दुधावरील साय आणि साखर एवढ्याच गोष्टीमध्ये हा डिलिशियस पदार्थ तयार होतो.

केळींचे प्रथम छोटे-छोटे तुकडे करा. यामध्ये एक कप उकळून कोमट झालेले दूध घाला. आवडत असल्यास यावर साय घाला. तुमच्या चवीनुसार साखर घाला. काही जण यावर सजावटीसाठी चेरीही घालतात.

आरोग्यासाठी काय फायदे?

केळी हिमोग्लोबीन वाढवते. शरीराला तातडीने ऊर्जा प्रदान करते. केळी खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. शिकरण केळी आणि दूध एकत्र करून बनवतात. त्यामुळे दुधातील प्रथिने, लोह आणि अन्य महत्त्वाचे घटक केळीसोबत एकत्रित मिळतात. परिणामी आरोग्याला त्याचा डबल फायदा होतो.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

केळीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला दुधातील पौष्टिक तत्वांची अतिरिक्त जोड मिळते. त्यामुळे शिकरण खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्तीला डबल बूस्टर डोस मिळतो.

उन्हाळ्यातील थकवा नाहीसा होता

केळी आणि दूध दोन्हीही घटक ऊर्जा शरीराला ऊर्जा पुरवतात. उन्हाळ्यात अनेक वेळा शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे पटकन थकते. अशा वेळी शिकरण खाल्ल्याने शरीराला तातडीने ऊर्जा मिळते आणि थकवा नाहीसा होता.

स्नायू बळकट होतात

केळी आणि दूध एकत्र घेतल्यामुळे शरीराला आवश्यक मात्रेत कॅल्शियमची पूर्तता होते. कॅल्शियम हाडांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे स्नायू बळकट होतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in