
आपल्या शरीराला वेगवेगळ्या खनिजद्रव्यांची आवश्यकता असते. त्यात मॅग्नेशियम एक मुख्य खनिजद्रव्य आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे भविष्यात स्नायूंसंबंधित तीव्र प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पुढील लक्षणे दिसत असेल तर दुर्लक्ष करू नका. वेळीच पूरक आहार घेऊन उणीव भरून काढा.
थकवा आणि अशक्तपणा
तुम्हाला जर दिवसभर सातत्याने थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. कारण मॅग्नेशियम ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे प्रमुख घटक आहे. ऊर्जा निर्मिती न झाल्यास शरीराला थकवा जाणवतो.
स्नायू दुखणे आणि पेटके येणे
मॅग्नेशियम हे तुमच्या हाडांचे कार्य सुरळीत राखण्यासाठी आवश्यक असते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूचे कार्य बिघडते. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखणे, हाडे दुखणे, पेटके येणे अशी लक्षणे दिसतात.
भूक कमी लागणे
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे भूक कमी होते कारण पचन क्रिया मंदावते. त्यामुळे सातत्याने पोट भरल्यासारखे वाटते. याशिवया मळमळ आणि उलट्या होणे ही देखील मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.
झोप न येणे
तुम्हाला निद्रानाश होत असेल तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. कारण मॅग्नेशियम हे झोपेच्या चक्रावर परिणाम करत असते. त्यामुळे कमी झोप होणे, चिडचिड होणे, असे प्रकार जाणवतात.
'ही' फळे खाल्ल्याने मॅग्नेशियमची उणीव झटपट भरून निघेल.
केळी: हे पोटॅशियम तसेच मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. दररोज एक केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक मॅग्नेशियम मिळते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.
पपई: यामध्ये मॅग्नेशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात.
अंजीर: अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. हे पचन सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
ब्लॅकबेरी: ते केवळ चवीलाच चविष्ट नसतात, तर ते मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना देखील असतात.
अॅव्होकॅडो: यामध्ये निरोगी चरबी भरपूर असतात. याशिवाय, ते मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)