बीट खाण्याचा कंटाळा येतो का? बनवा 'या' सोप्या आणि चविष्ट रेसिपी

आरोग्याच्या फायद्यांमुळे बीट हे उत्तम मानलं जातं. बीटची चव फारशी चांगली नसल्याने बरे़चजण बीट खाण्याचा कंटाळा करतात.
बीट खाण्याचा कंटाळा येतो का? बनवा 'या' सोप्या आणि चविष्ट रेसिपी

शरीरातील रक्ताची कमतरता, त्वचेसंबंधी आजार असतील तर डॉक्टर बीट खाण्याचा सल्ला देतात, बीट शरीरासाठी अत्यंत पौष्टीक मानलं जातं, बीटमध्ये रक्त वाढवण्याची क्षमता असून हिवाळ्यात याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. आरोग्याच्या फायद्यांमुळे बीट हे उत्तम मानलं जातं. बीटची चव फारशी चांगली नसल्याने बरे़चजण बीट खाण्याचा कंटाळा करतात. लहान मुलं देखील बीट खाण्यापासून पळ काढतात, पण हेच बीटाचे जर काही चविष्ट पदार्थ करून खाल्ले तर, लहान मुलांनाही बीट खायला आवडेल, जाणुन घेऊयात बीट पासुन तयार केल्या जाणऱ्या काही चविष्ट रेसीपी.

  • बीटच्या सालीपासून चटणी बनवा

साहित्य

1 कप बीटरूटचे साल

5-6 पुदिन्याची पाने

1 चमचा घट्ट दही, तिखट मसाला

1 टीस्पून कोथिंबीर

1 हिरवी मिरची, आले

3 लसूणच्या पाकळ्या, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ

बीटरूटच्या सालीपासून चटणी बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम, साल स्वच्छ धुवा आणि नंतर कापून ग्राइंडरमध्ये टाका ठेवा.

त्यात घट्ट दही, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून बारीक वाटून घ्या.

आता ही चटणी एका भांड्यात काढून त्यावर मीठ आणि चाट मसाला घालून मिक्स करून सर्व्ह करा.

  • बीटाचे लोणचे

साहित्य

बीट - 500 ग्रॅम

लसूणच्या पाकळ्या - 5-6

कढीपत्ता - 5

आले - 1/2 इंच

हिरवी मिरची - ४ बारीक चिरून

हळद - 1/2 टीस्पून

लाल-काश्मिरी पावडर - 1/2 टीस्पून

मेथी दाणे - 1/2 टीस्पून

व्हिनेगर - 1 चमचा

चवीनुसार मीठ

हिंग - 1/2 टीस्पून

अमचूर पाउडर - 2 चमचे

मोहरीचे तेल - 1/2 कप

आचारी मसाला - २ चमचे

मोहरी - २ चमचे

बीटचे लोणचे बनवण्याची सोपी रेसिपी

बीटचे लोणचे बनवणे खूप सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम बीट सोलून त्याचे छोटे तुकडे करा. बीट कापल्यानंतर, किमान 1 दिवस उन्हात ठेवा. जास्त सूर्यप्रकाश नसल्यास, बीट 2-3 दिवस सुकविण्यासाठी ठेवा. यामुळे लोणच्याची चव चांगली लागेल. कढईत मोहरीचे तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात ओवा, लसूण, आले, मिरची, कढीपत्ता, हळद-तिखट घालून 10-15 मिनिटे चांगले परतून घ्या. 15 मिनिटे मसाले तळल्यानंतर, सर्व बीटचे तुकडे पॅनमध्ये ठेवा आणि सुमारे 10 मिनिटे चांगले तळून घ्या. यानंतर पॅनमध्ये मीठ, आमचूर पावडर, आचारी मसाला, मेथीदाणा पावडर घालून चांगले मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवा. दुसर्‍या पॅनमध्ये १/२ कप मोहरीचे तेल घालून गरम करा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी सोडा. यानंतर, बीट व्यवस्थित तळून घ्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. थोडा वेळ थंड झाल्यावर लोणचे बरणीत टाका. आता त्यात गरम केलेले तेल घालून चांगले मिसळा आणि थोडा वेळ उन्हात ठेवा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in