
आपण रोज सकाळी टूथपेस्टने दात घासतो पण तुम्हाला जर सांगतिलं याच टूथपेस्टने तुम्ही लोखंडाचा तवा घासा तर तुम्हाला वाटेल काय वेड लागलंय. तसेच टूथपेस्ट चेहऱ्यावरील पिंपल्स लावा आणि जादू पाहा असे म्हटले तर...पण हे खरं आहे. दात घासण्याची टूथपेस्ट इतर अनेक गोष्टींसाठी उपयोगी आहे. तुम्ही वाचून थक्क व्हाल, तुम्हाला आश्चर्य वाटेल इतके याचे उपयोग आहेत.
मुरूमांच्या समस्यांवर उत्तम उपाय
चेहऱ्यावर मुरुम आले असतील तर त्यावर टूथपेस्ट लावावी. रात्री थोडी टूथपेस्ट लावून झोपावे. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून काढावा. हळूहळू मुरमांचा त्रास कमी होईल.
पिंपल्स दूर करण्यासाठी
कधी कधी आपल्या सुंदर चेहऱ्यावर एखादा पिंपल येतो. अशा वेळी आपला चेहरा हिरमुसल्यासारखा होतो. या पिंपल्सवर टूथपेस्ट लावल्यास तीन-चार दिवसात हा पिंपल निघून जातो. शिवाय पिंपलचा डागही पडत नाही.
डोळ्यांभोवतीचे काळी वर्तुळ
डोळ्यांभोवती काळी वर्तुळ कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तयार होतात. या काळ्या वर्तुळांवर हलक्या हाताने टूथपेस्ट लावावी. डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. हळूहळू डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे नाहीशी होतात.
लोखंडाचा तवा घासण्यासाठी
लोखंडाचा तवा घासण्यासाठी टूथपेस्टचा उपयोग होतो. तुम्हाला ऐकून विचित्र वाटत असेल पण हे शक्य आहे. लोखंडाचा काळा तव्याला पेस्ट लावून घासल्याने तवा खूपच कमी श्रमात झटपट साफ होतो.
दागिने उजळवण्यसााठी
ऑक्सिडाईज कानातले काही दिवसांनी अधिकाधिक काळपट होतात. त्याला टूथपेस्टने झाकल्यास ते चमकदार बनतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)