Sunset Points पाहण्याची आवड असेल तर भारतातील 'ही' ६ ठिकाणे पाहायलाच हवी

डोळ्यांसमोर हळूहळू मावळणारा सूर्य पाहणे तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. सूर्यास्त पाहून प्रत्येकजण आपले सर्व त्रास विसरतो आणि सुंदर दृश्यांमध्ये हरवून जातो. जर तुम्हीही अशा ठिकाणांच्या शोधात असाल जिथून तुम्हाला मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य पाहता येईल, तर ही माहिती तुमच्यासाठीच...
Sunset Points पाहण्याची आवड असेल तर भारतातील 'ही' ६ ठिकाणे पाहायलाच हवी
Freepik
Published on

परीक्षा संपल्या आहेत मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. अशा वेळी कौटुंबिक सहलीचे नियोजन केले जाते. तुम्हाला पर्यटनाची आवड असेल आणि सनसेट पॉइंट (Sunset Point) बघायला आवडत असेल तर भारतातील अत्यंत सुंदर सनसेट पॉइंट मानली जाणारी या ६ ठिकाणांची माहिती तुम्हाला असायलाच हवी. या ठिकाणावरून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य निश्चितच तुमचे मन मोहून घेईल. डोळ्यांसमोर हळूहळू मावळणारा सूर्य पाहणे तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. सूर्यास्त पाहून प्रत्येकजण आपले सर्व त्रास विसरतो आणि सुंदर दृश्यांमध्ये हरवून जातो. जर तुम्हीही अशा ठिकाणांच्या शोधात असाल जिथून तुम्हाला मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य पाहता येईल, तर ही माहिती तुमच्यासाठीच...

सनसेट पॉइंट, पुष्कर, राजस्थान (Sunset Points)

पुष्कर तलावाच्या काठावर असलेल्या सनसेट पॉइंटवरून सूर्यास्ताचे दृश्य तुम्हाला शांततेची अनुभूती देते. तलावावर सूर्याचे प्रतिबिंब आणि मंदिरातील घंटांचा आवाज अनुभवाला आध्यात्मिक बनवतो.

वॅगेटर बीच, गोवा (Sunset Points)

गोव्याचे समुद्रकिनारे स्वतःमध्ये रोमँटिक आणि सुंदर मानले जातात, परंतु व्हेगेटर बीचवरून सूर्यास्त पाहणे खूप खास आहे. येथील खडकांमध्ये आणि नारळाच्या झाडांमध्ये मावळणारा सूर्य एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा दिसतो.

गंगा घाट, बनारस (Sunset Points)

बनारस शहर हे आध्यात्मिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील घाटावरून गंगा नदीच्या मध्यभागी सूर्य उगवताना आणि मावळताना दिसतो. हे एक अद्भुत दृश्य आहे.

कन्याकुमारी, तामिळनाडू (Sunset Points)

तामिळनाडूतील कन्याकुमारी हे भारताच्या शेवटच्या टोकाला वसलेले आहे. येथे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र एकमेकांना भेटतात. इथून दिसणारे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही अप्रतिम असते. तुम्ही इथे कोणत्याही ऋतूत आलात तरी, हे सुंदर दृश्य पाहणे स्वर्गापेक्षा कमी नसेल.

कच्छचे रण, गुजरात (Sunset Points)

पांढरी वाळूची शेते आणि दूरवर पसरलेली शून्यता, हे दृश्य कच्छच्या रणला खास बनवते. सूर्यास्ताच्या वेळी, येथील पांढऱ्या मातीवर पडणारा सोनेरी प्रकाश स्वर्गाची अनुभूती देतो. स्वच्छ हवामानात येथील सूर्यास्ताचे दृश्य खूप सुंदर दिसते.

माउंट अबू, राजस्थान (Sunset Points)

राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन माउंट अबू त्याच्या सनसेट पॉइंटसाठी जगभर प्रसिद्ध आहे. अरवली टेकड्यांमध्ये वसलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. संध्याकाळी येथून टेकड्यांच्या मागे सूर्यास्त होण्याचे दृश्य पाहणे खूप सूंदर आहे.

logo
marathi.freepressjournal.in