स्टाईलिश दिसण्यासाठी 'हे' हटके प्रयोग नक्की करून पाहा

बऱ्याचदा उंची कमी असलेल्या मुलींना नवीन जीन्स लांब होते. अशावेळी टेलरकडे जाऊन जीन्स पॅन्टची साइज कमी करण्यापेक्षा थोडे हटके प्रयोग केल्यास तूम्ही अधिक स्टायलिश दिसू शकाल.
स्टाईलिश दिसण्यासाठी 'हे'  हटके प्रयोग नक्की करून पाहा

जीन्स घेताना हल्ली मुली बऱ्याच चोखंदळ असल्याचे दिसते. त्यात बाजारात दिवसागणिक येणाऱ्या फॅशनमुळे तर आपल्याला काय चांगले दिसेल, याचा अंदाज लावणे काहीसे कठीणच जाते. त्यामध्ये आपली उंची खूप कमी असणे किंवा खूप जास्त असणे, लठ्ठपणा या गोष्टीमुळे या स्टाईल करताना अडचणीत भर पडते. बऱ्याचदा उंची कमी असलेल्या मुलींना नवीन जीन्स लांब होते. अशावेळी टेलरकडे जाऊन जीन्स पॅन्टची साइज कमी करण्यापेक्षा थोडे हटके प्रयोग केल्यास तूम्ही अधिक स्टायलिश दिसू शकाल. जाणून घेऊया नवीन जीन्सवर कोणते प्रयोग करता येतील.

जीन्स फार लांब असेल तर खालून कापून छोटी करा. यामध्येही ती स्टायलिश दिसण्यासाठी त्याचे कापल्यानंतर येणारे धागे तसेच ठेवलेत तरी चालेल. हा प्रयोग हटके लूक देतो.

तुमची जीन्स अधिकच लांब असेल तर टेलरकडे न जाता घरीच तुम्ही ती लहान करू शकता. यातही जीन्स बाहेरच्या बाजूने फोल्ड न करता ती आतल्या बाजूनी लहान घड़ी करून फोल्ड करा. त्यामुळे जीन्स स्टायलिश दिसेल. यात एकाहून जास्त फोल्डस मारले तरीही चांगले दिसेल.

लांब जीन्स छोटी करण्यासाठी तिला खालुन शिवून घ्या, हेही एकदम विकतसारखे न शिवून घेता तुम्ही त्याला रफ लूक देऊ शकता मात्र, त्यासाठी हाताने शिलाई घालावी लागेल.

जीन्स वॉर्डरोबचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुमच्याकडे जीन्सचे स्टायलिश कजन असणे आवश्यक आहे, जीन्सवर विविध प्रयोग करून तुम्ही तिला कसाही लूक देऊ शकता, आपल्या स्टाइल व कम्फर्टनसार जीन्सला कट व फोल्ड करा. अशा आपल्याला हख्या तशा तयार झालेल्या जोन्सवर तुम्हा टी-शर्ट, वेगळ्या पॅटर्नचा टॉप आणि वेगवेगळ्या सँडल्स किंवा शूज घालू शकता. यामुळे तुमचा लुक आणि इमेज बदलण्यास नक्कीच मदत होईल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in