पिंपल्स घालवून त्वचा तजेलदार करण्यासाठी गुळाचा करा 'अश्या' पद्धतीने उपयोग

गुळामध्ये असलेले ग्लायकोलिक ॲसिड त्वचेवरील डाग, पिंपल्स घालवून त्वचा तजेलदार करण्यास मदत करते.
पिंपल्स घालवून त्वचा तजेलदार करण्यासाठी गुळाचा करा 'अश्या' पद्धतीने उपयोग

गुळामध्ये न्युट्रिएंंडंस आणि सेलेनिन नावाचे घटक असतात. जे त्वचेसाठी फारच फायद्याचे ठरतात. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट घटकामुळे त्वचा चिरतरुण राहण्यास मदत मिळते. त्यामुळेच गुळाचा स्किनकेअर रुटीनमध्ये अनेकजण उपयोग करतात. उसापासून मिळणारा हा गुळ त्वचेसाठी अत्यंत लाभदायी असतो. या शिवाय गुळामध्ये असलेले ग्लायकोलिक ॲसिड त्वचेवरील डाग, पिंपल्स घालवून त्वचा तजेलदार करण्यास मदत करते. 

गुळाच्या सेवनासोबतच तुम्ही तो चेहऱ्याला कसा लावायचा चला घेऊया जाणून 

  1. रोज एक गुळाचा खडा जर तुम्ही खाल्ला तर त्यामुळे तुमच्या शरीरात आवश्यक असलेले न्युट्रिएंड्स मिळतात. इतकेच नाही तर अनेकांना गुळाचे सेवन केल्यामुळे त्वचेवर झालेला बदल दिसून आला आहे. 

  2. स्किनकेअरमध्ये गुळाचा वापर करताना त्यापासून तुम्हाला एक चांगला फेसपॅकही बनवता येतो. तो बनवण्यासाठी एका भांड्यात चिरलेला गूळ आणि तेवढेच पाणी घेऊन गूळ विरघळून घ्यावा. त्यामध्ये बेसनाचे पीठ घालून त्याचा एक चांगला फेसपॅक बनवून घ्यावा. आणि तो चेहऱ्याला लावून 20 मिनिटांसाठी ठेवून द्यावा. चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

  3. एखाद्याला सतत पिंपल्स येत असतील तर अशांनी शरीरातील उष्णता कमी कऱण्यासाठी एक गुळाचा खडा खावा. असे सांगितले जाते की, गुळाचा एक खडा दिवसातून खाल्ल्यामुळे पिंपल्ससोबत लढण्याची ताकद शरीरात निर्माण होते. 

  4. चमकदार त्वचा हवी असेल तर एका भांड्यात एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा गुळाची पावडर घेऊन सगळे साहित्य एकत्र करुन चेहऱ्याला लावावी.साधारण 10 मिनिटांपर्यंत ते त्वचेवर ठेवावे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. 

  5. त्वचेवर डाग असतील तर अशावेळी गुळाची पावडर घेऊन त्यात टोमॅटोचा रस घालून तो चेहऱ्याला लावावा. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते. 

गुळ हे उष्ण प्रवृत्तीचे आहे. चेहऱ्याला लावताना तुम्ही ते सतत लावणे चुकीचे आहे. इतकेच नाही तर ज्यांची त्वचा अति संवेदनशील आहे अशांनी त्याचा वापर करताना जपून करावा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी. 

logo
marathi.freepressjournal.in