बाजारात मिळणारे मेकअप रिमूव्हर्स केमिकलपासून बनवलेले असतात ज्याचा त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो.Freepik
अशा परिस्थितीत मेकअप काढणे हे मोठे काम वाटते. पण असे काही नैसर्गिक पदार्थ वापरून तुम्ही सहज काही वाईट रिअक्शनशिवाय मेकअप काढू शकता. Freepik
खोबरेल तेलाच्या मदतीने तुम्ही मेकअप सहज काढू शकता. यासाठी तेल चेहऱ्यावर लावा आणि चोळा. हे तेल २ मिनिटे राहू द्या. यानंतर मऊ टॉवेलच्या मदतीने ते पुसून टाका. मेकअप निघून जाईल.Freepik
मेकअप काढण्यासाठी बेबी ऑइल हे सर्वोत्तम तेल मानले जाते. यामुळे तुमची त्वचा देखील मुलायम राहील.Freepik
फ्रिजमधून ताजे दूध एका भांड्यात घ्या आणि त्यात कापूस बुडवून चेहरा पुसून घ्या. काही वेळातच सर्व मेकअप गायब होईल.Freepik
कोरफडचं जेल हे एक उत्तम नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणून काम करण्याबरोबरच तुमचे काम सोपे करते. हे त्वचेला हळूवारपणे स्वच्छ करू शकते.Freepik