
बऱ्याचदा आपण प्रवास करताना शेतामध्ये पांढऱ्या रंगाचे अनेक मोठे अर्धगोल आकाराचे शेड पाहतो. पण बहुतेक जणांना त्याबद्दल कमीच माहिती आहे. या आधुनिक शेतीच्या पद्धतीला काय म्हणतात, ही शेती पद्धत शेतकऱ्याला किती प्रमाणात नफा मिळवून देते आणि कोण-कोणते पीक यामध्ये घेऊ शकतो याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
टनेल शेती
टनेल शेती एक आधुनिक आणि उत्तम शेती तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये प्लास्टिकच्या टनेल्स किंवा ग्रीनहाऊसच्या माध्यमातून झाडांची वाढ केली जाते. या अधुनिक प्रकारात कोणत्याही वातावरणात, अवकाळी पावसात, किंवा दूषित हवामानात आपण पीक घेऊ शकतो. तसेच या शेताला हवामान बदलाचा फटकाही कमी प्रमाणात बसतो. ही शेती पारंपारीक पद्धतीपेक्षा वेगळी असून या पद्धतीमध्ये पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवता येते.
टनेल शेतीचे फायदे
बदलणाऱ्या हवामानापासून संरक्षण: टनेल शेतीमुळे पिके थंड, उष्ण, पाऊस किंवा वाऱ्यापासून संरक्षित राहतात.
पीक उत्पादन वाढवते: यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढते, कारण यामध्ये पिकांना अनुकूल वातावरण तयार केले जाते.
दीर्घकाळ उत्पादन : टनेल शेतीमध्ये पिके अधिक वेळा आणि वाजवी दरात घेतली जाऊ शकतात. काही विशिष्ट फळे किंवा भाज्यांची उत्पादने सामान्यतः हिवाळ्यात किंवा वसंत ऋतू मध्ये घेतली जाऊ शकतात.
पिकांच्या रोगांचे नियंत्रण: पिकांना रोगांपासून वाचतात आणि एकाच ठिकाणी पिकांची विविधता वाढवता येते.
टनेल शेतीमध्ये वापरली जाणारी काही पिके
टोमॅटो,शिमला मिरची, स्ट्रॉबेरी, भाजीपाला (कोबी, भेंडी, वांगी) यासोबतच सर्व प्रकारची फळे भाजीपाला, फुलांचे पीक टनेल शेतीमध्ये घेतले जाते.
टनेल शेतीसाठी आवश्यक असलेली साधने
प्लास्टिक शीट : पिकांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळवून देणारा विशेष प्रकारचा प्लास्टिक वापरला जातो.
स्ट्रक्चर्स : टनेल तयार करण्यासाठी स्टील किंवा लाकडाचे फ्रेम्स वापरले जातात.
पाणी व्यवस्थापन : टनेल शेतीमध्ये योग्य पाणीपुरवठा असावा लागतो, त्यासाठी ड्रिप इरिगेशन प्रणाली वापरली जाते.
वायुवीजन : योग्य हवा खेळती राहण्यासाठी योग्य वेंटिलेशन आवश्यक आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे शेती तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)