त्वचेच्या सौंदर्यासाठी टूथपेस्टचा वापर करा, टूथपेस्टमुळे त्वचेवरील डाग होतात कमी!

टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला जातो, मात्र तुम्हाला माहीत आहे का त्वचेच्या सौंदर्यासाठीही टूथपेस्टचा वापर करतातात. टूथपेस्टच्या वापराचे असेही आहेत अनेक फायदे
त्वचेच्या सौंदर्यासाठी टूथपेस्टचा वापर करा, टूथपेस्टमुळे त्वचेवरील डाग होतात कमी!

आतापर्यंत टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला जात असे. मात्र तुम्हाला माहीत आहे का त्वचेच्या सौंदर्यासाठीही टूथपेस्टचा वापर करतातात. टूथपेस्टचे असेही अनेक फायदे

 • टूथपेस्टमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.

  त्वचेवर चमक आणण्यासाठी एक चमचा टूथपेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा, काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. मुरुमांची समस्या असल्यास मुरुमे असलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावा. दुसऱ्या दिवशी मुरुमे सुकून जातील.

 • पिंपल्सपासूनही होते सुटका

   पिंपल्स दूर करण्यासाठी 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 2 चमचे टूथपेस्ट मिसळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहर्‍यावर लावा. कोमट पाण्याने धुऊन टाका.

 • दोन तोंडी केसांपासून मुक्ती

  यासाठी एका वाटीमध्ये केळी मॅश करून घ्या. त्यात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट दोन तोंडी केसांवर लावून अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर केस धुऊन टाका. महिन्यातून एकदा हा प्रयोग करावा.

 • ओठांवरील चमक मिळवा

  ओठांवर चमक हवी असल्यास 1 चमचा मधात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट ओठांवर लावा. हे रोज अमलात आणू शकता.

 • चेहऱ्यावरील सुरकुत्याही टूथपेस्टच्या वापराने कमी होतात.

  यासाठी टूथपेस्ट सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावा, रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा. टूथपेस्टच्या मदतीने चेहऱ्यावरील काळे डागही कमी करता येतात, यासाठी टूथपेस्टमध्ये टोमॅटोचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. ब्लॅकहेडची समस्या असेल तर अक्रोडच्या स्क्रबसोबत टूथपेस्ट मिसळून लावा.

 • चेहऱ्यावरील नको असलेले केसांची सुट्टी

  चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवण्यासाठी आता पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. यासाठी केवळ टूथपेस्टच्या मिश्रणात लिंबू अथवा साखर मिसळा. या पेस्टला चेहऱ्यावर लावून मसाज करा.

logo
marathi.freepressjournal.in