भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा

स्पंज वापरून झाल्यानंतर तो पाण्यात जास्त वेळ ठेवू नका. भांडी धुवून झाल्यानंतर स्पंजमधील पाणी पूर्णपणे काढून तो कोरडा करून व्यवस्थित ठेवून द्या.
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा

पूर्वी भांडी घासण्यासाठी काथ्याचा वापर केला जायचा. स्टील किंवा अ‍ॅल्युमिनिअयमच्या बारीक तारांपासून तयार केलेल्या या काथ्यापासून भांडी घासली की भांडीही चकाचक साफ व्हायची, चिवटपणा दूर व्हायचा. पण हळूहळू स्टील, अ‍ॅल्युमिनिअमची भांडी जाऊन नॉनस्टीक, काच किंवा सिरॅमिक भांड्यांचा वापर केला जात आहे. ही भांडी घासण्यासाठी काथ्याऐवजी स्पंज किंवा स्क्रबरचा वापर करण्यात येऊ लागला आहे. स्पंजने भांडी घासताना या गोष्टींची काळजी घ्या. शक्य असल्यास महिन्यातून दोनदा स्पंज बदला. कारण स्पंज वांरवार वापरल्यानं खराब होतो, त्याच स्पंजनं भांडी धुणं म्हणजे एकप्रकारे आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणून स्पंज जास्त दिवस वापरण्याचा आग्रह करण्यापेक्षा तो वेळीच बदला.

स्पंज वापरून झाल्यानंतर तो पाण्यात जास्त वेळ ठेवू नका. भांडी धुवून झाल्यानंतर स्पंजमधील पाणी पूर्णपणे काढून तो कोरडा करून व्यवस्थित ठेवून द्या. असं केलं नाही, तर स्पंज आतून कुजण्याची शक्यता असते.

भांडी धुण्यासाठी नेहमी चांगल्या दर्जाच्या स्पंजचा वापर करा.

स्पंजमध्ये अनेकदा उष्टं खरखटं अकडतं, अन्नाचे कण स्पंजच्या छिद्रामध्ये अडकून बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे भांडी धुवून झाल्यानंतर स्पंज नीट स्वच्छ करा. अस्वच्छ स्पंज वापरल्यास स्पंजमधील बॅक्टेरिया भांड्यांना चिकटतात.

स्पंजने भांडी घासताना लिक्विड सोपचा वापर करा.

फक्त काच किंवा सिरॅमिक भांड्यासाठीच स्पंजचा वापर करा.

logo
marathi.freepressjournal.in